तालुक्यातील सरपंच कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांच्या पाठीशी

0
35

                                                             

ग्रामसेवकांच्यावर कारवाईची मागणी : सरपंच परिषदेचे सिईओंना निवेदन                                                                

जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी अर्चना वाघमळे व विस्तार अधिकारी मनोज जाधव यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करा असे निवेदन अखिल भारतीय सरपंच परिषदेच्या जत तालुका पदाधिकाऱ्यांनी सांगली जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत यांना दिले.जत पंचायत समिती म्हणजे गेल्या दोन वर्षापासून घोटाळ्याचे माहेरघर बनले असताना आता एक कर्तव्यदक्ष महिला गटविकास अधिकारी म्हणून अर्चना वाघमळे या काम करत आहेत. कार्यभार स्विकारल्यापासून कायदेशीर कामाचा धडाका लावत त्यांनी पंचायत समितीला ऊर्जितावस्था आणली आहे.तालुक्यातील कामचुकारपणा करण्यासाठी निर्ढावलेल्या सर्व कर्मचारी व ग्रामपंचायत कडील ग्रामसेवकांना सुरळीत व कायदेशीर काम करण्यास भाग पाडले आहे.कठोर निर्णय घेत कार्यक्षेत्रातील विकास कामांना गती व कार्यालयात सशक्त प्रशासन तयार केले आहे.भानगडीबाज ग्रामसेवकांना हे काम खटकत आहे.त्यामुळे मुठभर ग्रामसेवकांना एकत्रित करत संघटनेचा धाक दाखवत बिनबुडाचे आरोप करत कतृव्यदक्ष अधिकाऱ्यांची बदनामी चालवली आहे.

चांगल्या विकास कामाला खो घालण्याचा प्रयत्न ग्रामसेवक करत आहेत.ज्या ग्रामपंचायतीमध्ये अशिक्षित व महिला सरपंचांना अंधारात ठेवून बेकायदेशीररित्या मनमानी कारभार हे ग्रामसेवक करत आहेत.नेमके त्या प्रकारांना आळा घालण्याचे काम गटविकास अधिकारी वाघमळे व जाधव करत आहेत.त्यामुळे अशा ग्रामसेवकांचा भांडोफोड होईल या भितीने ते दबाब तंत्र वापरत आहेत.त्यांच्यावर जिल्हा परिषदकडून करवाई करावी अशी मागणी संरपच परिषदेने  केली आहे.सरपंच परिषदेचे जिल्हा अध्यक्ष अण्णासाहेब कोडग, जत तालुका अध्यक्ष बसवराज पाटील, संपर्क प्रमुख सुरेश कटरे, सहसंपर्क प्रमुख दिपक लंगोटे, संघटक राजाराम जावीर, आसंगीचे सरपंच श्रीमंत पाटील, सहसचिव किशोर बामणे, विनोद कोडग यांच्यासह सरपंच परिषदेचे पदाधिकारी उपस्थित होते.

जत प.सं.च्या बिडिओ अर्चना वाघमळे व मनोज जाधव यांच्यावर बिनबुडाचे आरोप करणाऱ्या ग्रामसेवकांवर कारवाई करा असे निवेदन मुख्य का.अधिकारी अभिजित राऊत यांना देण्यात आले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here