जत | नोकरीचे आमिष दाखवून एकाची 9 लाखाची फसवणूक |

0
18

तिघाविरोधात गुन्हा दाखलजत,प्रतिनिधी : तरुणांना नोकरीचे आमिष दाखवून नऊ लाख रूपये घेतल्याप्रकरणी जय पोलिसात तिघाजणांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला आहे. फिरोज बादशहा मुजावर रा.पांढरा बंगला परिसर,जत,अरुण वसंत देशमुख,अश्विनी अरुण देशमुख (दोघे रा.कोल्हापूर) असे गुन्हा दाखल झालेल्या संशयिताची नावे आहेत. याप्रकरणी अब्दुलरहेमान शेखलाल शेख रा. मुंबई यांने जत पोलिसात फिर्याद दिली.अधिक माहिती अशी,अब्दुलरहेमान शेख,अभिजित कुलकर्णी, समीर नदाफ यांना सेल टॅक्स विभागात नोकरीला लावतो म्हणून 4 ऑक्टोंबर 2014 पासून आजपर्यत संशयित तिघांनी 8 लाख 98 हजार रुपये घेतले होते.त्यानंतर सेल टॅक्स विभागात नोकरी लागल्याचे नेमणूक पत्र दिले. नेमणूक पत्राची तरूणांनी चौकशी केली असता ते बोगस असून अशी कोणतीही नेमणूक केली नसल्याचे संबंधित विभागाने तरुणांना सांगितले.त्यानंतर त्यांची फसवणूक झाल्याचे समोर आले. दरम्यान हे प्रकरण मिटवण्यासाठी संशयितांनी अब्दलरहेमान याला 1 लाखाचा धनादेश दिला होता.मात्र तोही खात्यावर पैसे नसल्याने वटला नाही.त्यामुळे तरुणांनी जत पोलिसात धाव घेतली.याप्रकरणी अब्दुल रहमान शेख यांची सुमारे फसवणूक झाली आहे.त्याशिवाय त्यांच्या अन्य दोन मित्रांची फसवणुक झाल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.अद्यापर्यंत याप्रकरणी कोणालाही अटक करण्यात आली नाही. अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गाढवे करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here