जत | पाणीपट्टीचे पैसे भरलेल्या गावांना म्हैशाळचे पाणी सोडा,अन्यथा आंदोलन करु ; माजी सभापती प्रकाश जमदाडे |

0
8

जत,प्रतिनिधी :जत तालुक्यात भीषण दुष्काळाची परिस्थिती आहे. शेतकऱ्यांनी पैसे भरून दोन महिने झाले तरीही म्हैसाळाचे पाणी सोडले जात नाही.त्यामुळे सोमवार दि.14 पर्यंत पाणी न सोडल्यास बुधवारी आमदार विलासराव जगताप ,जिल्हा परिषद सदस्य ,सभापती,पंचायत समिती सदस्य,पदाधिकारी व पाटबंधारेच्या कृष्णा कोयना उपसा जलसिंचन कार्यालय समोर बेमुदत उपोषण करणार असल्याची माहिती माजी सभापती प्रकाश जमदाडे यांनी दिली. याबाबतचे निवदेन संबंधित विभागांना दिले आहे.

 या निवेदनात म्हटले आहे,गेल्या तीन महिन्यापासून म्हैसाळ योजनेचे आवर्तन सुरु आहे.जत तालुक्यातील येळवी,कासलिंगवाडी,बागलवाडी,सिंगणहळळी,या गावातील शेतकऱ्यांनी एक ते दीड महिन्याअगोदर पैसे भरुनही अद्याप पाणी सोडले नाही.त्यामुळे शेतीचे तर सोडाच पण पिण्याच्या पाण्याचा प्रश्न,अतिशय गंभीर बनला आहे.याबाबत खासदार संजय पाटील,आमदार विलासराव जगताप यांनी सदरच्या गावांना पाणी सोडावे म्हणून वारंवार सूचना देवूनही अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे शेतकऱ्याच्यात तीव्र संताप व्यक्त आहे.संबधित विभागाने यांची तातडीने गंभीर दखल घ्यावी,अन्यथा दि.16 पासून संबंधित गावाना मिळेपर्यंत बेमुदत उपोषण करण्याचा इशारा जमदाडे यांनी दिला आहे.दरम्यान तालुक्यात दुष्काळाची दाहकता दिवसेंदिवस वाढतच आहे.शेतकरी पूर्णपणे खचून गेला आहे.पिण्याचा प्रश्न अतिशय जटिल बनला असताना म्हैसाळाच्या पाण्यासाठी दोन-दोन महिने अगोदर पैसे भरूनही पाणी मिळत नाहीशेतकऱ्यांनी गंभीर इशारा देऊनही प्रशासन पूर्णपणे डोळेझाक करीत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here