जत | युवकांच्या मौजमस्तीवर अंकुश ठेवण्याची गरज |

0
3

जत,प्रतिनिधी :आजच्या आधुनिक युगात तरूणाई स्मार्ट झाली आहे. पिकनिक,  पिक्‍चर, वाढदिवस, जेवणावळ यासह विविध कारणांसाठी युवक कॉलेजलाही दांड्या मारतात. मात्र, याचवेळी वेगळे असे काही घडत असल्याने त्यांच्यावर अंकुश ठेवणे गरजेचे आहे. बिंळूर ता.जत येथील अल्पवयीन मुलीची छेडछाड व नंतर मुलींचा पालकास मारहाण प्रकरणानंतर तालुक्यातील युवा पिठी धोकादायक मुडवर असल्याचे समोर आले आहे. बिंळूर ता.जत येथील जत येथे शिक्षणासाठी येणाऱ्या मुंलीची छेडछाड प्रकरणे नित्याची झाली आहेत.गुरूवारी सायकांळी असाच प्रकार जतहून बिंळूरला जाणाऱ्या एका अल्पवयीन मुलींची एका मुलांने छेड काढली.मुलींने हा प्रकार पालकांना सांगितल्यानंतर जाब विचारण्यासाठी गेलेल्या पालकांना मुलांच्या नातेवाईकांनी बेदम मारहाण केल्याची घटना घडली होती.सध्याचे अनेक युवक हे व्यसनाच्या आहारी गेले आहे. त्यातून मस्ती करताना अनेकांनी आपले प्राण गमावले आहे. विद्यार्थ्यांच्या या मौज मजेमुळे घरच्यांना मात्र घोर लागून राहत आहे. त्यामुळे या महाविद्यालयीन विद्यार्थ्यांवर लक्ष ठेवण्याची गरज आता व्यक्‍त होऊ लागली आहे.बरेचसे विद्यार्थी पालकांना अंधारात ठेऊन कॉलेजला मौजमस्ती करण्यासाठी जातात. कॉलेजचा प्रत्येक क्षण एन्जॉय कसा करता येईल याकडे विद्यार्थी आपले लक्ष अधिक केंद्रीत करतात. मित्र—मैत्रिणीचा वाढदिवस, वार्षिक स्नेहसंमेलन, सहल, सण  या गोष्टी  सेलिब्रेशन करताना विद्यार्थ्यांना कशाचीच अट राहत नाही. विशेष म्हणजे या सगळ्या प्रकाराची पालकांना मात्र पुसटशीही कल्पना नसते.दिवसभर ते मोबाईलवर डोकं घालून बसतातच. त्याचबरोबर फिरायला गेल्यावर जीव घेणी कसरत करत तरुणाई सेल्फीच्या मोहात पडत असतात. कुठे कठड्यावर तर कुठे धबधब्याच्या काठावर तर कुठे रेल्वे ट्रॅकवर कधी जातील आणि कसा सेल्फी घेतील याचा नेम नाही. खरं तर आपली मुले महाविद्यालयात  शिकत आहेत, या संभ्रमात मुलांनी पालकांना पुढे काय वाढून ठेवले याची साधी कल्पना नसते. विद्यार्थ्यांना आपले आई—वडील करत असलेल्या कष्टाची जाणीव ठेवली पाहिजे.  मौजमस्तीत स्वत:बरोबर पालकांचेही नुकसान करत असल्याची जाणीव विद्यार्थ्यांनी ठेवली पाहिजे. त्यासाठी कॉलेज प्रशासनानेही याबाबत लक्ष दिले पाहिजे तरच अशा गंभीर प्रकारांना आळा बसेल.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here