करजगीत | तीव्र पाणी टंचाई,टँकरची मागणी |

0
2

करजगी,वार्ताहर : करजगी ता.जत येथे जनावरांच्या चाऱ्यासह, पिण्याच्या पाण्याची मोठी टंचाई निर्माण झाली आहे.ग्रामपंचायतीच्या पाणी योजनाचे सर्व पाणी स्त्रोत आटले आहेत.त्यामुळे ग्रामस्थांना पाणी मिळवण्यासाठी दोन ते तीन किलोमीटरवर भटकंती करावी लागत आहे.घरातील लहानग्यासह अबालवृध्दांचा दिवसभर पाणी मिळविण्याच वेळ जात आहे.गेल्या तीन वर्षांपासून पावसाने दगा दिल्याने करजगी सह परिसरात पिके वाळून गेली आहेत.खरीप,रब्बी हंगाम पूर्णत: वाया गेला आहे. त्यामुळे तीव्र चारा टंचाई निर्माण झाली आहे.जनावरे जगवायची कशी असा प्रश्न येथील शेतकऱ्यांना पडला आहे.पुढे पाच महिन्याचा काळ संघर्षाचा बनला आहे. त्याशिवाय पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. त्यामुळे करजगी येथे चारा छावणीसह, प्रशासनाने तातडीने टँकर चालू करावा अशी मागणी कलाण्णा बालगाव यांनी केली आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here