जत,प्रतिनिधी:बालगाव (ता.जत)येथे सिद्धेश्वर तलावाच्या पायथ्याशी सुरू असलेल्या तिनपानी जुगाराचा अड्ड़्यावर उमदी पोलीसांनी छापा टाकून सव्वा लाखाचा मुद्देमाल जप्त केला.तीन जुगाऱ्यांना पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.बालगाव नजिकच्या तलावाजवळ काही जण तीन पानी पत्ते खेत असल्याची माहिती खबऱ्याद्वारे उमदी पोलीसांना लागली होती.त्यावरून सहाय्यक पोलिस निरीक्षक भगवान शिंदे यांच्या पकाने छापा टाकला.त्यात 4 मोटरसायकली,रोख रक्कम व मोबाईल असा एक लाख,अडतीस हजाराचा मुद्देमाल जप्त केला.तर शिवानंद चिकनूर,रवी मळगाव,संजीव कोळी या जुगाऱ्यावर ताब्यात घेत कारवाई केली.





