गोमाता दैवत, प्रत्येकाच्या घरी किमान एक तरी गाय असावी : आम्रतानंद स्वामीजी.

0
10

आंवढी,वार्ताहर : गोमात ही इतर जनावरांपेक्षा वेगळी असुन तिच्या पोटात तेहत्तीस कोटी देव आहेत,असे का म्हंटले जाते तर गायीचे दुध,तुप,इतर पदार्थ व गोमुत्र सुध्दा बहुगुणकारी आहे हे सिध्द झाले आहे.गोमाता आपले दैवत असून प्रत्येकाच्या घरी किमान एकतरी गाय असावी असे प्रतिपादन बालगाव मठाचे परमपुज्य अमृतानंद स्वामीजी यांनी केले. ते आवंढी (ता.जत) येथील भाऊसो विठोबा कोडग व सौ.सखुबाई कोडग या दांपत्यानी देवासारखी संभाळलेल्यागाभण गोमातेची पुजा केली.त्याप्रंसगी स्वामीजी बोलत होते.स्वामीजी म्हणाले की,कोडग दांपत्यांनी एक गोमाता पाळलेली आहे,तीचे नाव गोपी असे ठेवलेले आहे.मागील आठवड्यात गोपीचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम कोडग कुटुंबियांनी अगदी धुमधडाक्यात केला होता.त्या कार्यक्रमाचे फोटो व दैनिक संकेत टाइम्सची बातमी पाहुन स्वामीजींनी कोडग कुंटूबियांची भेट घेत गोपी गायीची पुजा केली.तसेच गोमातेसाठी पेंड व गुळाच्या ढेपी प्रदान केल्या. कोडग कुटुंबाचे गोमातेचा चांगला सांभाळ करुन तिचे डोहाळे पुरवण्याचा एक अगळावेगळा कार्यक्रम केल्याने त्याचा सम्मान केला.त्याबद्दल कोडग कुंटूबियांनी स्वामीजी विषयी कृञज्ञता व्यक्त केली. उपस्थितांना किमान एकतरी गोमाता पाळावी असा उपदेशही केला.चक्क एका गायीसाठी स्वामीजी बालगावच्या श्री.गुरुदेव आश्रमातून कोडग यांच्या घरी आल्याने कोडग कुटुबियांबरोबरच ग्रामस्थही भारावून गेले.यावेळी स्वामीजींचे स्वागत पत्रकार डॉ.प्रदिप कोडग यांनी केले,तर आश्रम व स्वामीजींविषयी माहिती पत्रकार दिनराज वाघमारे यांनी दिली.याप्रसंगी धोंडिराम कोडग,वसंत कोडग,सौ.सिंधुताई कोडग,आंबुताई कोडग व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.आंवढी ता.जत येथील देशी गायीची पुजा करताना बालगाव आश्रमाचे अमृत्तानंद स्वामीजी व मान्यवर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here