जत पालिकेत विकास कामावरून भाजप-कॉग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकात हाणामारी

0
4

जत,प्रतिनिधी : नगरपालिकेच्या दलित वस्ती सुधार योजनेतून सुरू असलेल्या विकास कामावरून काँग्रेस-राष्ट्रवादी व विरोधी भाजप नगरसेवकात गुरूवारी शाब्दिक बाचाबाची व हाणामारीत झाली. हा वाद विकोपाला गेल्याने काही ज्येष्ठ सदस्यांनी मध्यस्थी केल्याने प्रकरण थांबले.मात्र या प्रकरणाची शहरात जोरदार चर्चा सुरू होती. नगरसेवकात तुंबळ हाणामारी झाल्याची वेगळ्या पद्धतीने चर्चा रंगविली जात होती. मात्र याबाबत रात्री उशिरापर्यत पोलीसात कोणतीही तक्रार दाखल नव्हती. 

जत नगरपालिकेच्या दलित वस्ती सुधार योजना कामासाठी 1 कोटी 80 लाखांचा निधी प्राप्त झाला आहे.या कामाच्या निधीचे वाटप दलित वस्ती असणाऱ्या प्रभागात झाले आहे.

त्यातील निविदा प्रक्रिया सदोष असल्याची तक्रार भाजपच्या विरोधी नगरसेवकांनी जत न्यायालयात दाखल केली आहे. गुरुवारी दुपारी यावरूनच भाजप व राष्ट्रवादी-काँग्रेसच्या नगरसेवकात शांब्दिक बाचाबाची झाली, वाद प्रंचड विकोपाला गेल्याने दोन्ही गटाच्या नगरसेवकांनी एकमेकाच्या कॉलर धरली. काही नगरसेवकांच्या मध्यस्थीमुळे हा वाद तात्पुरता संपला. मात्र दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांच्या 

जमवाजमवीमुळे शहरात वातावरण टाईट झाले होते. पालिकेच्या दलित वस्ती सुधारण्याचे निधीतून विविध प्रभागात कामे सुरू आहेत. 

यात प्रभाग एक मधील काँक्रीट रस्त्याला सहा लाख 66 हजार, प्रभाग चारमध्ये काँक्रीट गटारसाठी साठ लाख,प्रभाग सहामध्ये गटारीसाठी साठ लाखाचा निधी वितरित झाला आहे. कामाचा शुभारंभही सत्ताधारी गटाकडून झाला आहे. दरम्यान यापैकी प्रभाग एक मधील कामाची निविदा प्रक्रिया सदोष असून या प्रक्रियेविरोधात भाजपच्या नगरसेवकांनी  जत न्यायालयात दाद मागितली आहे.त्यावरून विकास कामाच्या विविध विषयावर दोन्ही गटात सतत खटके उडत आहेत. याविषयावरून दोन्ही गटाच्या जोरदार सभा ही झाल्या आहेत. एकमेकावर खालच्या पातळीवर जात आरोप-प्रत्यारोप झालेत. गुरुवारी विरोधी भाजपचे काही नगरसेवक व काँग्रेस-राष्ट्रवादीचे नगरसेवक समोरासमोर आले.पालिकेत सभागृहात दोन्ही गटाच्या नगरसेवकात चर्चेच्या निमित्ताने वाद झाला,तो प्रंचड विकोपाला गेला मध्यस्थी करून तणाव निवळला मात्र दोन्ही गटाचे अन्य काही नगरसेवक सभागृहात दाखल झाल्याने वादाने उग्र रूप घेतले.भाजप व काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नगरसेवकात हाणामारी झाली.एकमेकांचे कॉलर पकडून बघून घेण्याची धमक्या देण्यात आल्या. तब्बल दीड तास नगरपालिकेच्या सभागृहात हा गोंधळ सुरू होता.काही ज्येष्ठ नगरसेवकांनी मध्यस्थी करत तात्पुरता हा वाद संपला आहे.मात्र भविष्यात या विषयावरून रणकंदन होण्याचे संकेत आहेत. दरम्यान वादावर कोणतीही तक्रार पोलिस ठाण्यात दाखल झाली नव्हती.दिवसभर यावरून नागरिकात जोरदार चर्चा सुरू होती.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here