गुगवाड,वार्ताहर : बसवेश्वर ऐक्य क्षेत्र कुडल संगम येथे दि.11 जानेवारी ते 14 जानेवारी 2019 रोजी 32 वा शरण मेळावा आयोजित केले आहे.बसवत्वाभिमानी वर्षातून एकदा तरी एक ठिकाणी समावेश होण्याची अत्यंत आवश्यक आहे, म्हणून समता व बंधुत्व वाढविण्यासाठी सहकारी होईल या उद्देशाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात येतो.
हा भव्यदिव्य समारंभ कूडल संगम पीठाध्यक्ष प्रथम महिला जग्दगुरु डॉ.माते महादेवी यांच्या नेतृत्वाखाली संपन्न होणार आहे.प्रथम शरण मेळावा 1987 जानेवारी पासून सुरूवात झाली आहे. आता पर्यंत शरणाचां संख्या वाढत आहे. यावर्षी सुद्धा कर्नाटक महाराष्ट्र,आंध्रप्रदेश, तेलंगणा,तमिळनाडू,गोवा सह अनेक वेगवेगळ्या राज्यातुन सहा ते आठ लाखाच्या पेक्षा अधिक शरण उपस्थित राहणार आहे.
रोज पहाटे सामुहिक प्रार्थना,लिंग दिक्षा, अनेक अनुभवी बसव तत्व प्रसारक कडून चिंतन मंतन, लिंगायत धर्म एक स्वतंत्र धर्मसाठी पुढाकार घेतलेल्या शरणाचां सत्कार,वचन पठन,वचन गायन स्पर्धा,सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.या संमारंभाला येणाऱ्या सर्व शरणाना राहण्याचे व महाप्रसाद व्यवस्था केली आहे.या शरण मेळाव्यात योगशिबिर डॉ.कल्याण मठ,शरण एम.बी.पाटील(गृहमंत्री कर्नाटक राज्य)यांच्या हस्ते उद्घाटन व षटस्थल बसव ध्वजारोहण जमखंडी आमदार आंनद न्यामगौडर यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. सारंगमठ श्रीशैल जग्दगुरु सारगंधर देशीकेंद्र स्वामिजी,डॉ.शिवमुर्थी स्वामिजी मुरगामठ, चित्रदुर्गा,जगन्माता गंगामाताजी अक्कमहादेवी महिला पिठ धारवाड असे अनेक मठाधिश व राजकीय सामाजिक आणि कार्यकर्ते शरण मंडळी उपस्थित राहणार आहेत. जत तालुक्यातील जास्तीत जास्त शरण बंधू भगिनी या भव्यदिव्य संमारंभात उपस्थित राहावे म्हणून राष्ट्रीय बसव सेना गुगवाड व राष्ट्रीय बसवदल खोजनवाडीचे अध्यक्ष प्राध्यापक शरण एम.जि.काराजनगी यांनी आव्हान केले आहे.





