वाळेखिंडीत उच्चशिक्षीत तरूणीची गळफासाने आत्महत्या

0
3

जत,प्रतिनिधी :जत तालुक्यातील वाळेखिंडी येथील उच्चशिक्षीत तरूणीने गळफास लावून स्वत:ची जीवनयात्रा संपविली.कु.प्रतिक्षा आप्पासाहेब काटकर,(वय-21)असे या तरूणीचे नाव आहे.वाळेखिंडी डोंगरगाव रस्त्यावरील काटकर वस्तीवरील राहत्या घरी प्रतिक्षा हीने दोरीने गळफास लावून घेतला. दुपारी साडेबाराच्या सुमारास ही घटना घडली. 

प्रतिक्षा ही उच्चशिक्षीत होती.तीने बी.सी.ए.  ही पदवी संपादन केली होती.बेंगलोर येथे तिला नोकरीचा कॉलही आला होता. 

मंगळवारी दुपारी घरातील सर्वजण शेतात गेले होते.साडेबाराच्या सुमारास तिने घरातच दोरीने गळफास लावून घेतला. याबाबत जत पोलीसांत नोंद झाली आहे.आत्महत्येचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही .

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here