आंवढी,वार्ताहर : आंवढी (ता.जत) येथे दारूबंदीसाठी झालेल्या मतदानात आडवी बाटलीला सर्वाधिक 724 मतदान मिळवत जिल्ह्यात इतिहास घडविल्याने महिलांनी जल्लोष केला.सांगली जिल्ह्यातील अशी पहिलीच घटना आहे. यापुर्वी काही गावात मतदान झाले होते.मात्र बाटली आडवी झाली नव्हती.आंवढीत तो इतिहास रचला आहे. गेल्या सहा महिन्यापासून सुरू असलेले दारूबंदीचे आंदोलन या निवडणुकीनंतर फत्ते झाले. गावातील परवानाधारक वाईन शॉप बंद करण्यासाठी मतदान प्रक्रिया राबवण्यात आली होती.रविवार तारीख 6 रोजी मतदान घेण्यात आले.यात 1154 पैंकी 724 महिलांनी मतदानाचा अधिकार बजावला.त्यापैंकी आडवी बाटली-659,उभी बाटलीला 38 मतदान झाले,तर 27 मतदान बाद झाले.430 महिलां मतदारांनी मतदान केले नाही. सर्वाधिक मतदान आडव्या बाटलीला पडल्याने आंवढीतील परवानाधारक वाईन शॉप,बेकायदा दारू,जुगार अवैध धंदे हद्दपार होणार आहेत.अवैध धंद्यामुळे वैतागलेल्या महिलांनी सुरू केलेल्या या मोहिमेला मोठे यश आले आहे.आंवढीतील आडव्या बाटलीसाठी रवीवारी मतदान झाले.प्रचंड यश मिळाले. यात गेल्या चार महिन्यांपासून मोहिमेचे नेतृत्व करणारे संरपच आण्णासाहेब कोडग,उपसरपंच अण्णासाहेब बाबर,संगिता कोडग,रतन कोडग,प्रतिभा कोडक,काचन कोडग,अर्चना कोडग,सविता कोडग,अलका कोडग,मनाबाई कोडग,मालन कोडग,मनिषा कुंभार,नंदाबाई देशमुख, शालन कोडग,रत्नप्रभा कोडग,अनुसया तोरणे,सुनिता वाघमारे,सखुबाई कोडग या महिलांनी कष्ठ घेतले.हा विजय या महिलासांठी ऐतिहासिक ठरला.रविवारी सकाळपासून गावात निवडणुकीचे वातावरण होते.निवडणूक जाहीर झाल्यापासून गेल्या आठ दिवसापासून प्रमुख महिलांनी निवडणूक प्रक्रिया घराघरात माहिती दिली होती. महिलात जागृती केली होती. रविवारी तो दिवस उजाडला सकाळपासून मतदान केंद्रावर महिलांची मोठी गर्दी होती.मोठ्या संख्येने महिलांनी आडव्या बाटलीला मतदान केले.एक प्रकारे दारू करण्याचे शिवधनुष्य गावातील महिलांनी उचलल्याचे या निकालावरून सिद्ध झाले आहे.गावातील तरुण सरपंच आण्णासाहेब कोडग यांनी जलसंधारणाच्या कामात थेट मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आंवढीत आणून विकासाच्या प्रवाहाला सुरूवात केली. गावाची परिवर्तनाच्या दिशेने वाटचाल चालू आहे.त्यात अवैध धंदे खो घालत होते.दारू,मटका,जूगार यामुळे युवा पिढीसह, समाज भरकट होता.अनेक घरे बरबाद झाली होती.दारूसारख्या व्यसनाने गावाची शांतता भंग होत होती. त्यामुळे धंदे बंद होणे गरजेचे होते.त्यासाठी महिलांनी घराबाहेर पडून प्रारंभी जत पोलीस ठाणे, उत्पादन शुल्क,तहसील कार्यालय आदी ठिकाणी आंदोलने केली होती.त्यात बेकायदा अवैद धंदे बंद करण्यात आले होते.मात्र गावातील परवानाधारक वाईनशॉप बंद करण्याला मतदान घेण्याची गरज होती. तशी मागणी महिलांनी उत्पादन उत्पादन शुक्ल विभागाकडे केली होती. उत्पादन शुल्क विभागाने रीतसर जिल्हाधिकारी यांच्याकडे तसा प्रस्ताव दिला.त्यानुसार जत महसूल विभागाच्या वतीने रविवारी मतदान घेण्यात आले. सायंकाळी 5 नंतर मतमोजणी झाली.त्यात सर्वाधिक 724 मतदानाने आडव्या बाटलीचा मोठा विजयी घोषित करण्यात आला.तालुक्यातील अशी पहिली घटना या निमित्ताने आंवढीत घडली आहे.सर्व धंदे मुळासकट उखडून काढण्याचे काम येथील महिलांनी केले आहे.ते तालुक्याला आदर्श करणारे ठरले.यापुढे तालुक्यातील अनेक गावे दारू,मटका,जूगार सारख्या अवैद्य धंद्यातून बाहेर पडलतील काय?त्यासाठी महिला पुढाकार घेतील?असे अनेक प्रश्न यानिमित्ताने तालुक्यातील जनतेसमोर उभे राहिले आहेत.अवैध धंद्यामुळे तालुक्यातील गावागावात अनेक कुटुंब उध्वस्त होताना चित्र आहे. पोलीस यंत्रणा,उत्पादन शुल्क,संबंधित विभाग त्यापुढे हतबल होतात. त्यामुळे लोकप्रतिनिधी, नागरिक,महिलांनी अशा आंवढी सारखा पुढाकार घेण्याची गरज आहे. निवडणूक प्रक्रियेसाठी तशिलदार सचिन पाटील मंडल अधिकारी श्री काळे तलाठी श्री भोसले यांनी काम पाहिले.
आंवढीत बाटली आडवी झाल्यानंतर महिलांनी विजयी सभा घेतली.
Home Uncategorized आंवढीत अखेर बाटली आडवी,जिल्ह्यात इतिहास घडला : महिलांनी राबविलेली दारूबंदीची मोहिम फत्ते





