जत,प्रतिनिधी :घोलेश्वर (ता.जत)येथील म्हैसाळ कॅनॉलवर काम करणारा मजूर झोपडीत जळून खाक झाल्याची दुर्देवी घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.मयत मजूर मध्यप्रदेशमधील असून सुब्राह्म मडावी (वय-50,कोडकाळ परसबाग, बालाघाट) असे त्यांचे नाव आहे.सुब्राह्म मडावी हा कॅनॉलवर काम करत होता.सध्या घोलेश्वर हद्दीत कॅनॉलचे काम सुरू आहे. कॅनॉल शेजारी कामगारांच्या पालाच्या झोपड्या आहेत.तेथे सुब्राम्हास राहत होता.सुब्राम्हासास दारूचे व्यसन होते. शनिवारी तो नेहमीप्रमाणे अतिमद्य सेवन करून झोपडीत झोपला होता.मेणबत्ती पडून काही कळायच्या आत झोपडीने पेट घेतला. सुब्राह्म हा दारू पिवून मद्यधुंद असल्याने
त्याला बाहेर पडता आले नाही.आगीच्या तीव्र ज्वाळात तो झोपडीत जळून खाक झाला. इतर कामगारांनी जत पोलीसांनी कळविले.याप्रकरणी जत पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद झाली आहे.सदरचा तपास संजय माने करीत आहे.





