दुष्काळाने हतबल शेतकरी आत्महत्येकडे,जत तालुक्यातील चित्र

0
6

जत,प्रतिनिधी:विदर्भ-मराठवाड्याचे शेतकरी आत्महत्याचे लोण आता जत तालुक्यात पसरू लागले आहे.सततचा दुष्काळ,कर्जबाजारी,उत्पादित शेतीमालाला योग्य भाव न मिळणे,द्राक्ष,डांळिब बागाचे अवर्षण,रोगाने नुकसान,पाण्याकरिता भरमसाठ पैसे खर्च करुनही पाणी न लागणे,बेरोजगारी या कारणामुळे जत तालुक्यातील दुष्काळ ग्रस्त शेतकरी आत्महत्येकडे वळत आहे.तालुक्यात गेल्या तीन महिन्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत.त्यात रामपूर(मल्लाळ )उटगी,जाडरबोबलाद येथील शेतकऱ्यांचा समावेश आहे. सलग दोन वर्षे द्राक्षबाग वाया गेल्याने व डोक्यावर कर्ज कसे फेडायचे या निराशेतून रामपूर ता.जत येथील शेतकरी गोरख हणमंत साळे यांनी आत्महत्या केली. उटगी येथील आठ एकर शेती असणारे लायाप्पा विंचूर यांनी शेतात तूरी हे पिक घेतले होते.पाण्याअभावी उत्पादन पेरलेल्या तुरीएवढेही आले नाही.त्यामुळे वैतागल्याने आत्महत्या केली.गुरुवारी जाडरबोबलाद येथील शेतकऱ्यांने कर्जास कंटाळून व डाळिंब पाण्याअभावी वाळून गेल्याने आत्महत्या केली.तीन महिन्यात तीन शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याने प्रशासनाने सतर्क होण्याची वेळ आली आहे.

गेल्या चार वर्षात पर्जन्यमान कमी झाले.तालुक्यातील बहुतेक शेती कोरडवाहू आहे.पावसावर अवलंबून असणारी शेती असल्याने पावसाने बगल दिली की शेतकरी अडचणीत येतो.ते गेल्या दहा वर्षात सतत घडत आहे.कर्ज माफीही आॅनलाईनच्या गर्तेत  अपेक्षित स्वरुपाची झाली नाही.शेतकऱ्यांचे स्थिती गंभीर होत असताना कर्जमाफीचे घोंगडे अद्याप भिंजतच ठेवले आहे.शेतीशिवाय उत्पादनाचे दुसरे साधन नसल्याने शेतकरी वर्ग पूर्णतःखचला आहे.बँका,सोसायटी,

फायनास,सावकारी, हातउसने,घेतलेले कर्जाचे हप्ते वेळेत भरु शकत नाही.कर्जाचे डोंगर वाढतच चालल्याने निराशातून शेतकरी नाईलाजास्तव आत्महत्येकडे वळत आहे. खासगी सावकराचे जाच सहन करावा लागत आहे.बेहिशोबी सुलतानी वसुलीने शेतकरी कुमकुमवत, हतबल बनत आहे. दहा ते पंधरा एकर शेती असलेला शेतकरी उसतोडीस गेला आहे.त्यातच जे शेती करतात.त्यांना सततच्या अवर्षन,गारपिठ,वादळी वाऱ्यांचा सामना करावा लागत आहे.सततची संकटे शेतकरी आत्महत्या वाढीस बंळ देत आहेत.

शासनाने ठोस मदत करावी

जत तालुक्यातील खरीप,रब्बी हंगाम वाया गेले आहेत.शेतीची मशागत,पेरणी केलेले पैसे देखील उत्पन्न मिळत नसल्याने बुडाले आहेत.गतवर्षी विमा भरूनही अनेक शेतकरी त्यापासून वंचित राहिले आहेत.विहिरीत पाणी नसताना देखील महावितरच्या मनमानीमुळे मोटारीची भरमसाठ विजबिले आकारली जातात.पिकच न आल्याने सोसायटीचे कर्ज थकित गेली आहेत.त्यामुळे सोसायट्याही अडचणीत आल्या आहेत.

कर्जमाफी व विशेष मदतीची अपेक्षा

भीषण दुष्काळामुळे शेतीवर अवलंबून असलेले पशुपालक शेतकरी मोडकळीस येत आहे.शासनाने सरसकट कर्जमाफी करावी,पशूधन वाचविण्यासाठी चारा छावण्या, विशेष दुष्काळी मदत घ्यावी अशी मागणी दुष्काळी जनतेतून होत आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here