किशोर बामणे यांच्या प्रयत्नाला यश :पाण्याची टाकी,सिमेंट रस्ते,गटारीची कामे होणार
गुगवाड,वार्ताहर :बसर्गी ता.जत येथील मागासवर्गीय वस्तींसाठी दलितवस्ती सुधार योजनेंतर्गत 2018 /19 या वर्षांसाठी सुमारे 30 लाख रुपये निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली असून लवकरच विकासकामांना सुरुवात होईल,अशी माहिती उपसरपंच श्री किशोर बामणे यांनी दिली.
जत पंचायत समितीच्या सभापती सौ.सुशीला तांवशी व जेष्ठ नेते शिवाप्पा तांवशी यांच्या माध्यमातून बसर्गी मधील श्री.संत रोहिदास नगर येथे सिमेंट काँक्रीटचे रस्ते,पेग्विंन ब्लॉक तसेच गटारी,आंबेडकरनगरमध्ये उंच आरसीसी पाण्याची टाकी व पाईपलाईन अशी कामे होणार आहे. दिनांक 2 जानेवारी 2019 ला जिल्हा परिषदचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मंजुरी दिली आहे.बसर्गी मध्ये दोन्ही दलित वस्तीमध्ये पायाभूत सुविधांचा अभाव होता,यांचा विचार करून बसर्गी ग्रामपंचतचे उपसरपंच किशोर बामणे व ग्रामसेवक श्री.खरमाटे यांनी जेष्ठ नेते शिवाप्पा तांवशी ह्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रस्ताव तयार करून पंचायत समिती जतद्वारे जिल्हा परिषद सांगलीला दिला होता.सभापती सौ सुशीला तांवशी व उपसरपंच किशोर बामणे यांच्या विशेष प्रयत्नातून गावातील विविध विकास कामासाठी आतापर्यंत सुमारे 50 लाख रुपये इतका निधी मंजूर करून आणला आहे.
Attachments area





