उमदी,वार्ताहर : कोंतेबोबलाद ता. जत येथील एका महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी युवराज मधुकर सुर्यवंशी (रा.कोतेंबोलाद)यांच्या विरोधात उमदी पोलीसात गुन्हा दाखल झाला. घटना 31डिसेंबरला रात्री आठच्या सुमारास गडदेवस्ती येथे घडली.पिडित महिलेने उमदी पोलीसात फिर्याद दिली.
अधिक माहिती अशी,कोतेंबोबलाद येथील 31 डिसेंबर 2018 रोजी गडदे वस्ती येथे युवराज सुर्यवंशी यांने पिडित महिलेस कन्नड भाषेमध्ये मला तु आवडतेस,माझे तुझ्यावर प्रेम आहे.असे म्हणून झोंबाझोंबी करत विनयभंग केला असे फिर्यादीत म्हटले आहे.अधिक तपास सा.पोलीस निरिशिक्षक भगवान शिंदे करत आहेत.





