आंवढी, वार्ताहर: आंवढी ता.जत येथील दारू बंदीसाठी आडवी व उभी बाटली यासाठी रविवार ता.6 जानेवारीला सकाळी आठ ते सायकांळी पाचपर्यत मतदान होणार आहे.तर त्याच दिवशी पाचनंतर मतमोजणी प्रक्रिया होणार आहे. जतचे तहसीलदार सचिन पाटील हे निवडणूक निर्णय अधिकारी आहेत.त्यांमुळे गावातील दारूबंदीच्या तक्रारदार महिलासह पदाधिकाऱ्यांनी आडव्या बाटलीसाठी प्रचाराच धडका लावला आहे.आंवढीत दारूबंदीसाठी गावातील महिलांनी अंदोलन केले होते.ग्रामसभेत ठराव घेण्यात आले होते.
आंवढीतील बेकायदेशीर दारू, गांजा,मटका,सिंदी अड्डे बंद करावेत म्हणून महिलाची समिती करून आंवढीतील महिला लढा देत आहेत.सध्या बेकायदा दारू व अवैध धंदे बंद जत पोलीसांनी बंद केले आहेत.मात्र परवाऩाधारक वाईनशॉप बंद करण्यासाठी अडचणी होत्या मतदान घेण्याची गरज होती.महिलांनी तशी चार महिन्यापुर्वी मागणी केली होती.त्यानुसार जिल्हाधिकारी(उत्पादन शुल्क विभागाच्या आदेशावरून) निवडणूक कार्यक्रम जाहिर करण्यात आला. रविवार ता.6 जानेवारीला मतदान व त्याच दिवशी पाचनंतर मतमोजणी होणार आहे.निवडणूकीसाठी तीन वार्ड करण्यात आले आहे. त्यासाठी मतदारांची यादी क्र.12,14 व 15 जाहीर करण्यात आली आहे.सुमारे सातशेजण मतदानाचा अधिकार बजावतील.येथील जिल्हा परिषद मुलांच्या केंद्र शाळेत ही प्रक्रिया पुर्ण होणार आहे.दरम्यान निवडणूकीसाठी महिलांनी प्रचार सुरू केला आहे. संरपच आण्णासाहेब कोडग व उपसरपंच अण्णासाहेब बाबर यांचीही त्यांना मोठी साथ लाभली आहे.गेल्या आठ दिवसापासून प्रमुख अंदोलक महिलांनी घरोघरी जाऊन दारूबंदीचे महत्व पटवून देत आडव्या बाटलीला मतदान करा यासाठी आवाहन करत आहेत.संध्या गावात निवडणूकीचे वातावरण आहे.





