जत,प्रतिनिधी :जत येथे यल्लमा यात्रा सुरु आहे.यात्रेसाठी आटपाडीतून वैशाली प्रकाश पाटील ह्या जत येथे आल्या होत्या.यात्रा संपवून त्या सांगोलाला जाण्यास शेगाव चौक येथे जत-सांगोला बसमध्ये दरवाज्यातून आत प्रवेश करते वेळी अज्ञाताने चोरट्यांनी दीड तोळ्याचे गंठण लंपास केले.ही घटना बुधवारी जत येथील शेगाव चौकात घडली.याबाबत वैशाली पाटील यांनी जत पोलिसात फिर्याद दिली आहे.घटना नोंद असून तपास हवलदार कणसे करीत आहेत.





