अधिग्रहण केलेल्या पाण्याचे थकीत बिल मागणीसाठी शेतकऱ्यांचे उपोषण

0
5

जत,प्रतिनिधी : जत पंचायत समितीच्या भोगळ कारभारामुळे नागरिकांच्या पिण्यासाठी अधिग्रहण केलेल्या विहिरीतील पाण्याचे पैसे न दिल्याने कुंभारी येथील शेतकरी फिरोज दिलावर मणेर यांनी उपोषणाचा इशारा दिला आहे.त्यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,सन-2016-17 सालात टंचाईग्रस्त बेंळूखीसाठी मणेर यांच्या अधिग्रहण केलेल्या विहिरीतून पाणी पुरवठा केला होता.त्यासाठी शासननियमाप्रमाणे पैसे मिळावेत म्हणून मणेर यांनी रितसर पंचायत समिती जतकडे मागणी केली होती.मात्र तब्बल दोन वर्षापासून त्यांना पैसे मिळाले नसल्याने त्यांनी सोमवार ता.8 जानेवारी 2018 पासून पंचायत समिती कार्यालयासमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.

दरम्यान पंचायत समितीच्या प्रशासनाच्या वरकमाईला सोकलेल्या अधिकारी,कर्मचाऱ्यामुळे स्व:ताची शेती वाळवून जनतेला पाणी देऊनही पैसे देण्यास आजपर्यत टाळाटाळ केली जात आहे.दुसरीकडे कोटीच्या रक्कमा असलेल्या टँकरची बिले तातडीने दिले  जातात.तालुक्यातील टंचाई ग्रस्त काळात अधिग्रहण केलेल्या विहिरी मालकांच्या देण्यासाठीचे पैसे पंचायत समितीकडे आले आहेत.मात्र रक्कमा कमी असल्याने त्यातून अपेक्षीत माल मिळत नसल्याने अधिकारी त्याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शेतकरी करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here