यल्लम्मादेवी यात्रेच्या शेवटच्या दिवशी दोन लाख भाविकांची उपस्थिती,पारपांरिक किचाचा सोहळा संपन्न ; पालखी, सबीना रिंगण,मिरवणूकीने यात्रेची सांगता

0
8

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रंध्दास्थान असलल्या श्री. यल्लम्मादेवीच्या यात्रेत गुरूवारी मुख्य दिवशी दोन लाखावर भाविकांनी हजेरी लावली.यात्रेतील पारपांरिक कीच हा विधी लाखो भाविकांच्या उपस्थितीत पार पडला. यात्रेची गुरूवारी किचाचा विधी संपल्यानंतर यांत्रेची सांगता झाली.पहिले दोन दिवस संथ असलेल्या भाविकांची गर्दी बुधवारी मोठ्या प्रमाणात वाढली होती.गेल्या तिन दिवसापासून सुरू असलेल्या यात्रेचा बुधवारी किचाचा मुख्य विधी संपन्न झाला. किचाच्या कार्यक्रमास विविध मान्यवरांची उपस्थिती होती. सबिना व पालख्यांनी फेऱ्या मारल्यानंतर देवीच्या पुजाऱ्यांने किचामध्ये (पारपांरिक पध्दतीने गोवऱ्या पेटविलेल्या विस्तवात) प्रवेश केला. त्याचवेळी यात्रा संपन्न झाल्याची व पुढील वर्षातील यात्रेची घोषणा करण्यात आली. बुधवारी सकाळी देवीची पालखी व सबीना यांची सवाद्य राजवाड्यावरून निघून मिरवणूकीने पालखी माने-पाटील यांच्या घरी आली.त्या ठिकाणी विधिवत पुजा केल्यानंतर पालखी यात्रेकडे रवाना झाली.मंदिराजवळ पालख्या येताच रिंगण पार पडले,आईचे चांगभल म्हणत पालखी व सबीन्यावर खारिक खोबरे,भंडारा उधळून भाविकांनी आपला नवस फेडला.रिंगण सोहळ्यानंतर कीच स्थळापर्यत मिरवणूकीने सबीना आणण्यात आला. लाखो भाविकाच्या उपस्थितीत बेल-भंडारा उधळत,पांरपारिक वाद्याच्या गजरात पुजाऱ्यांचे किचाच्या मैदानात आगमन झाले. मानकऱ्यांनी किचामध्ये नैवद्य अर्पण केल्यानंतर पुजाऱ्यांने किचामध्ये प्रवेश केला. कीचाचा विधी पार पडल्यानंतर पुजाऱ्यांने स्वता:स देवीच्या मुख्य गाभाऱ्यात कोंडून घेतले. त्यानंतर देवीच्या गांभाऱ्याचा दरवाजा परपंरेनुसार बंद करण्यात आला. तो शनिवारी आमवस्येला उघडण्यात येणार आहे. यात्रेचा मुख्य कार्यक्रम संपले तरीही पुढे आठवडाभर यात्रा चालू राहते.आमवस्येनंतरही पुन्हा यात्रा भरते. भाविकांची गर्दी कायम असते.

श्री. यल्लम्मादेवीच्या यात्रेत देवीच्या पालखी व सबीन्याची रिंगण, मिरवणूक काढण्यात आली.बुधवारी मुख्य दिवस असल्याने मोठी गर्दी झाली होती.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here