जत,प्रतिनिधी : जतच्या प्रसिद्ध यल्लमा देवीची यात्रा गेल्या दोन दिवसांपासून सुरू आहे.जत तालुक्यासह,परिसरात पडलेल्या दुष्काळाचे सावट यात्रेवर मोठ्या प्रमाणावर दिसले.दरवर्षीच्या लाखो भाविकांच्या गर्दीची यंदा घट झाली. सोमवारपासून सुरू झालेल्या यात्रेत गंधओटी, नैवेद्य अशा कार्यक्रमाने दोन दिवस संपन्न झाले.यात्रेत दरवर्षी लाखो भाविकांची उपस्थिती असते. पहिले दोन दिवस त्यात मोठी घट झाली आहे. दुष्काळाने बाजार समितीने आयोजित केलेल्या जनावरे प्रदर्शनाला अल्प प्रतिसाद लाभला. दुष्काळाचा फटका यावेळी भाविकांनाही बसला.गंधर्व नदीचे पात्र कोरडे पडल्याने भाविकांना नवस फेडताना अडचणीचा सामना करावा लागला.यात्रा कमिटीने पाण्याची सोय करूनही पाणी टंचाई यात्रेत जाणवत होती.आज होणाऱ्या किचाच्या कार्यक्रमानंतर यात्रा फुटते.त्यानंतर जत तालुक्यातील भाविक यात्रेत येतात.यात्रेनिमित्त बाजार समितीने आयोजित केलेल्या जनावरे विक्री व प्रदर्शानात जनावरांची संख्या मोठ्या प्रमाणात घटली होती.सुमारे पंचवीस एकर परिसरात दरवर्षी जनावरे बांधायला जागा नसायची यंदा तेथे जनावरांची तुरळक गर्दी होती.यात्रेत पाळणे,चित्रपट गृहाची संख्या कमी झाली आहे.मंगळवारी यात्रेत नेवैध,देवीची परडी भरणे,जग पुजणे आदी कार्यक्रम झाले.दर्शनासाठी रांगा लागल्या होत्या.
नगरपरिषद संवेदनाहिन
यलम्मादेवी मंदिरानजिक असणाऱ्या पाणीपुरवठा योजनेच्या विहिरीत चार जीव जाऊनही नगरपरिषद प्रशासनाने विहिरीवर अद्यापपर्यत जाळी बसविली नाहीत.तात्पुर्ते काटेरी झुडपे लावण्यात आली आहेत.त्या झुुडपातील काही झुडपे भाविकांनी जळण म्हणून वापरल्याने विहिर धोकादायक बनली आहे.
1.जत श्री.यलम्मादेवी यात्रेत भाविकांची तुरळक गर्दी होती., 2.मंगळवार नैवेधचा दिवस असल्यामुळे देवीच्या परडी व जगची पुजा करण्यात येत होती.3.मंदिरासमोरील गंधर्वनदी कोरडी पडल्याने भाविकांची गैरसोय होत होती.4.दुष्काळाने जनावरे प्रदर्शनात जनावराची संख्या घटली आहे.5.धोकादायक नगरपरिषदेची विहिर









