लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मरणार्थ जिल्हाभर आरोग्य शिबिरांचे आयोजन

0
20

जत,प्रतिनिधी :लोकनेते राजारामबापू पाटील यांच्या स्मरणार्थ गेल्या ३४ वर्षांपासून घेण्यात येत आलेल्या आरोग्य शिबिरांचा जिल्ह्यातील लाखो रुग्णांनी लाभ घेतला आहे. यावर्षीच्या आरोग्य शिबिरांचाही मोठया संख्येने लाभ घ्या,असे आवाहन राजारामबापू पाटील सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष पी.आर.पाटील यांनी केले.

       राजारामबापू सह.साखर कारखाना,व सांगली जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाच्या वतीने स्व.बापूंच्या स्मरणार्थ संपूर्ण जिल्ह्यात महिनाभर आरोग्य शिबिरे घेण्यात येणार आहेत. या शिबिरांचा शुभारंभ जत तालुक्यातील जाडरबोबलाद येथील गजानन कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात करण्यात आला. जिल्हा परिषदेचे माजी सदस्य ईश्वराप्पा रवि (पाटील) यांच्या हस्ते स्व.बापूंच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी कारखान्याचे संचालक विराज शिंदे,प्राचार्य व्ही.एम.मुलगे, प्रा.एन.एस.स्वामी,ग्रामसेवक एस.बी.बिरादार,कल्लाप्पा उबर्जी प्रामुख्याने उपस्थित होते. जिल्हा परिषदेचे आरोग्य व शिक्षण सभापती तम्मनगौडा रवि (पाटील) यांचे या शिबिरास विशेष सहकार्य मिळाले.

        पी.आर.पाटील पुढे म्हणाले, स्व.बापूंचा जत,कवठेमहांकाळ, आटपाडी,खानापूर या आपल्या दुष्काळी तालुक्यांवर विशेष लोभ होता. त्यांनी या तालुक्यांचा दुष्काळ हटविण्यासाठी खूजगाव धरणाचा प्रयत्न केला. मात्र दुर्दैवाने त्यांना राजकीय विरोध झाला,आणि आजही हे तालुके दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. बापूंचे साध्या पडशाने निधन झाल्याने आम्ही राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आ.जयंतराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यात आरोग्य शिबीरे घेत आहोत. या शिबिरांना उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.

       ईश्वराप्पा रवि (पाटील) म्हणाले, स्व.बापू हे लोकोत्तर नेते होते. त्यांची जत तालुक्याशी नाळ जोडली होती. त्यांनी आमच्या कॉलेजची मंजुरी, तसेच ग्रँड साठी मोठे सहकार्य केले होते. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.डी.जी.पवार,उमदीचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बी.टी.पवार, येळवीच्या वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमा कांबळे, स्त्री रोग तज्ञ डॉ.सुवर्णा सपकाळ, कारखान्याचे वैद्यकीय अधिकारी डॉ.प्रकाश म्हाळुंगकर यांनी आरोग्य शिबीर यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले.

     एक महिन्याचा आरोग्य कार्यक्रम- २ जानेवारी-नेवरी,मोहिते वडगाव,३ जानेवारी-विटा,वेजेगाव,४ जानेवारी- खानापूर,बोरगाव(वा),५ जानेवारी- रांजणी,देशिंग,६ जानेवारी-ढालगाव, आगळगाव,७ जानेवारी-बिळूर, शेगाव, ८ जानेवारी- उमदी,संख,९ जानेवारी-वळसंग,डफळापूर,१० जानेवारी-हिंगणगाव, खेराडेवांगी,११ जानेवारी-कवठे पिराण,नांद्रे,१२ जानेवारी-आटपाडी, करघणी,१३ जानेवारी-खरसुंडी, दिघंची,१४ जानेवारी-कवलापूर,भोसे,१६ जानेवारी-बोरगाव (ता),येळावी,१७ जानेवारी-येडेमच्छिन्नद्र,१८ जानेवारी-कुंडल,भिलवडी,१९ जानेवारी-सावळज,मणेराजुरी,२० जानेवारी-वायफळे, मांजर्डे,

२१जानेवारी-खंडेराजुरी,एरंडोली,२२ जानेवारी-आरग,म्हैसाळ,२३जानेवारी-मांगले,कुरळप,२४ जानेवारी-चरण,मणदूर,२५ जानेवारी-अंत्री,शिरशी,

२७ जानेवारी-वाळवा,कामेरी,२८ जानेवारी- कासेगाव,नेर्ले,२९ जानेवारी- येलूर,पेठ,३० जानेवारी- बागणी,बावची,३१ जानेवारी- चिंचणी,हातनूर,१ फेब्रुवारी- कोकरूड,सांगाव. या शिबिरांना मध्ये सर्व प्रकारच्या तपासण्या व उपचार केले जाणार असून शस्त्र क्रिया साठी शासनाच्या महात्मा जोतिबा फुले जीवनदायी योजनेचे सहकार्य घेतले जाणार आहे.

फोटो ओळी- जाडरबोबलाद (ता.जत) येथे लोकनेते राजारामबापू स्मृती आरोग्य कार्यक्रमांचे उदघाटन करताना माजी जि.प.सदस्य ईश्वराप्पा रवि (पाटील). समवेत पी.आर. पाटील,विराज शिंदे,डॉ.प्रकाश म्हाळुंगकर,डॉ.डी. जी.पवार,डॉ.बी.टी.पवार,डॉ.हेमा कांबळे,डॉ.सुवर्णा सपकाळ,प्राचार्य व्ही.एम.मुलगे व मान्यवर.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here