जत,प्रतिनिधी:आलिबाबा सारख्या माणसाने भष्ट्राचाराबद्दल बोलण्याचा नैतिक अधिकार नाही.सत्ताधारी वर भाजपच्या चोरांनी केलेली सर्व आरोप खोटे आहेत.जत शहराच्या विकासासाठी आम्ही सत्ताधारी कटीबध्द आहोत.दिलेला पदाचा वापर जनहितासाठी करत असल्याची माहिती संवाद सभेत जतच्या नगराध्यक्षा सौ.शुभांगी बन्नेनवार व उपनगराध्यक्ष आप्पासो पवार यांनी दिली.त्या जत येथे जत नगरपरिषदेतील काँग्रेस,राष्ट्रवादी ,बसपच्या संवाद मेळाव्यात बोलत होते.
आमदार विलासराव जगताप यांच्यासह भाजप नगरसेवकांनी केलेल्या आरोपाचे खंडन करत सत्ताधारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, बसपा नगरसेवकांनी संवाद सभेचे आयोजन केले होते.भाजपच्या आरोपाला पुराव्यानिशी प्रत्युत्तर या सभेतून दिले. नगराध्यक्षा बन्नेनवर म्हणाल्या आ. जगताप यांनी जतच्या जनतेसाठी काही केले नाही उलट स्वतःच्या घरासमोर 12 लाखाची भुयार गटार करून घेतली, घराला जाण्यासाठी उमराणी रोडवर बायपास रस्ता करून घेतला. कपडे बदलावेत तसे पक्ष बदलले.आज तेच पक्षनिष्ठेबाबत बोलत आहेत. त्यांनी आम्हाला पक्षनिष्ठेबद्दल शिकवू नये.आमचे नेते विक्रमसिंह सावंत हे कर्नाटकातून पाणी आणण्यासाठी पाणी परिषदा घेत होते त्यावेळी आ.जगताप हे त्यांची कुचेष्टा करत होते. आज तेच श्रेयवादासाठी प्रयत्न करत आहेत.असा आरोप केला. आ.जगताप यांनी नगराध्यक्षा बन्नेनवर यांचे पती अशोक बन्नेनवर यांचे नाव न घेता ते ‘वंचित’ असल्याची टिका केली होती. या टिकेलाही उत्तर देत आ.जगताप यांनी प्रथम भाजपमधील बंडाळी थांबवावी. भविष्यात आ. जगताप यांना वंचित बहुजन समाजच इतिहास घडवून दाखवेल असा टोला त्यांनी लगावला. उपनगराध्यक्ष पवार म्हणाले विरोधकांना जवळ केले, त्यांच्याही प्रभागात समसमान निधी दिला व त्यांनी उलट नगर परिषदेची बदनामी करण्याचे षडयंत्र रचत आहेत. आमदार जगतापसह नगरसेवक विजय ताड व उमेश सावंत यांच्यावर त्यांनी टिका केली.भाजपची सभा ही टिकेची सभा असल्याचा टोला नगरसेवक निलेश बामणे यांनी लगावला.उमेश सावंत हे वाळू चोर असून त्यांच्या टिकेला महत्व नाही. तुबची बबलेश्वर योजनेचे राजकारण केले जात आहे. जतकरांनी विक्रमसिह सावंत यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा रहावे असे आवाहन केले. यावेळी बसवराज पाटील, अजिंक्य राक्षे यांनीही भाजपवर टिका केली.नगरसेवक भूपेद्र कांबळे, टिमू एडके यांनी आक्रमक भाषा शैलीत खरपूस समाचार घेतला. सभापती टिमु एडके यांनी आ. जगताप, उमेश सावंत, दीप्ती सावंत व विजय ताड यांच्यावर जोरदार निशाना साधला.आ.जगताप यांचे अवैध धंद्याना अभय असून त्यांच्या बगलबच्याचेही तेच उद्योग आहेत. आपण स्वछता सभापती असून शहरातील घाणीबरोबरच राजकारणातील ही घाण ही स्वच्छ करत असल्याचे स्पष्ट केले. नाना शिंदेकडून आरोपांचे खंडण :
नाना शिंदे यांनी शिल्लक असलेल्या 17 कोटीच्या निधीचा लेखाजोखा मांडत भाजप नगर सेवकांनी केलेले सर्व आरोपाचे मुद्देसुत खंडण केले. शहरात जत नगर परिषदेची लवकरच नवीन इमारत, दोन बगीचे, अग्नीशमन दलाची गाडी आदी कामे करण्यात येणार आहेत. कचरा टेंडरची प्रक्रिया सुरू अडवून राष्ट्रीय महामार्गाच्या कामकाजाबाबत संबधीत कार्यालयास पत्र व्यवहार करण्यात आला आहे.यासभेस नगराध्यक्षा सौ.भारती जाधव, अश्विनी माळी, साहेबराव कोळी, इकबाल गवंडी, स्वप्नील शिंदे, निलेश बामणे, नामदेव काळे, नगरसेविका गायत्री शिंदे, वनिता साळे, नाना शिंदे, सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष बसवराज पाटील, यांची प्रमुख उपस्थिती होती.





