यलम्मादेवी यात्रेस उत्साहात सुरूवात

0
5

जत,प्रतिनिधी : महाराष्ट्र व कर्नाटकातील लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या जतच्या श्री. यल्लम्मा देवीची यात्रा सोमवारपासून मोठ्या उत्साहात सुरू झाली.यात्रेसाठी भाविकांनी पहिल्या दिवशी देवीस गंध लावून ओटी भरली, नवस फेडला.सोमवारी पहिल्या दिवशी हजारो भक्तांनी देवीचे दर्शन घेतले.पुढचे दोन दिवस यात्रेचा मुख्य दिवस आहेत.यासह आमवश्येपर्यत यात्रेत लाखों भाविक उपस्थित राहणार आहेत. जतचे ग्रामदैवत असणारी देवी महाराष्ट्र कर्नाटकात प्रसिद्ध आहे.आपले नवस खरे करणाऱ्या देवीवर भाविकांचे मोठी श्रद्धा आहे. त्यामुळे यात्रा काळात सुमारे सात लाखापर्यंत भाविकांची गर्दी उपस्थिती असते.अनेक भाविक नवस फेडण्यासाठी पहिल्या दिवसापासून यात्रेत हजेरी लावतात. मंदिरासमोरील कुंडात स्नान करून भक्तिभावाने देवीची ओटी भरली जाते.यंदाही यात्रा कमिटीकडून सर्व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत.पिण्याचे पाणी वाहतूक व्यवस्था,दुकाने,रस्ते, पाळणे आदी व्यवस्था करण्यात आल्या आहेत.मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती लक्षात घेऊन सर्व यंत्रणा तयार करण्यात आल्या आहेत.आज यात्रेचा दुसरा दिवस आहे.त्यामुळे मोठ्या संख्येने भाविक येणार आहेत.मुख्य कार्यक्रम बुधवारी किचाचा आहे.किच पडल्यानंतर भाविक यात्रास्थंळ सोडतात.त्यानंतर ही तीन दिवस यात्रेत मोठ्या संख्येने गर्दी असते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here