जतेत कॉग्रेस-बसप,राष्ट्रवादीची आज संवाद सभा

0
5

जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदचे काँग्रेस-बसप, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीच्या नगराध्यक्ष उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवकांची संवाद सभा आज तारीख 29 डिसेंबर 2018 रोजी सायंकाळी सहा वाजता पेठेतील मारुती मंदिर येथे होणार आहे.जत शहरात गेल्या वर्षभरात विकास कामाचा धडाका लावला आहे.पालिकेत अपुरे कर्मचारी असतानासुद्धा शहराच्या विकासासाठी सत्ताधारी काँग्रेस-राष्ट्रवादी बसवा प्रयत्न करत आहेत. त्याउलट विरोधी भाजपचे नगरसेवक शहराच्या विकासात अडथळा आणायचा अशा हेतूने काम करत आहेत.जत शहरात भाजप नेते आमदार विलासराव जगताप यांना कधीच स्विकारले नाही, याची मोठी सल त्यांना आहे. जत तालुक्याच्या राजकारणात गुंडगिरी,दहशत,जातिवाद, अवैध धंदे,तस्करी,मटक्याचे अड्डे हे कोणाचे आहेत.कोन विकास कामांना अडकाठी घालतात.त्यामुळे जत शहराचे कसे नुकसान होत आहे. यावरही या संवाद कार्यक्रमात भांडाफोड होणार आहे.भाजपने केलेले आरोप म्हणजे चोराच्या उलट्या बोंबा असा प्रकार आहे.त्यामुळे त्यांचे खरे चेहरे, भ्रष्ट भूमिका या संवाद सभेच्या माध्यमातून जनतेसमोर मांडायची आहे. त्यासाठी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन कॉग्रेसचे युवा नेते गणेश गिड्डे यांनी केले.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here