धावडवाडी,चोरोचीत चोरीच्या 9 दुचाकी जप्त,एलसीबी,जत पोलीसांची कारवाई : 2 संशियत ताब्यात

0
3

जत,प्रतिनिधी : धावडवाडी व चोरोचीतील दोन वेगवेगळ्या कारवाईत चोरीच्या 8 दुचाकी  जप्त करत, दोन संशियतांना पोलीसानी ताब्यात घेतले आहे.जत पोलीस व स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाने ही कारवाई केली.जिल्हाभरात दुचाकी चोरीच्या घटना वाढल्या आहेत.शेकडो दुचाकी चोरी झाल्या आहेत.त्यापार्श्वभुमीवर जिल्हा पोलीस प्रमुख सुहैल शर्मा यांनी कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार गुप्त माहितीच्या आधारे स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक छापामारी करत असताना धावडवाडीत प्रमोद भैय्यासाहेब गडदे (वय 19,रा.बाज) संशयास्पद फिरताना आढळून आल्याने त्याची चौकशी केली असता त्याच्या धावडवाडी येथील गॅरेजच्या पाठीमागे सहा दुचाकी आढळून आल्या. चौकशी केली असता अथणी व जत परिसरात त्या चोरी केलेल्या गाड्या असल्याचे त्यांने पोलिसांना सांगितल्याने त्याला ताब्यात घेत गाड्या जप्त केल्या.एमएच 10 बीडब्ल्यू 1864, एमएच 10 एएल 8207,एमएच 10 सीपी 9331 या व बिगर नंबरच्या तीन अशा सहा गाड्या गडदे याच्याकडे आढळूंन आल्या.दुचाकी व संशियताला जत पोलीसाच्या ताब्यात दिले आहे.अधिक तपास जत पोलिस करत आहेत.

चोरोची तालुका कवठेमंकाळ येथे जत पोलिसांनी केलेल्या कारवाईत अजित वाघमारे रा.चोरोची याच्या घरी छापा टाकून दोन चोरीच्या गाड्या जप्त करण्यात आल्या.कुंभारी येथील दुचाकी चोरी प्रकरणी जत पोलिसात गुन्हा दाखल झाला होता. त्याच्या तपासा दरम्यान हवालदार संजय माने,कॉन्स्टेबल अंगतराव मासाळ यांनी ही कारवाई केली.अनेक दिवसानंतर जत तालुक्यातील दुचाकी चोरी प्रकरणी हे मोठी कारवाई आहे 8 चोरीच्या दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत त्यामुळे जत शहर व परिसरातील दुचाकी चोरीचा छडा लागण्याची शक्यता आहे.दरम्यान दुचाकी जप्त केलेले माहिती मिळताच काही चोरी झालेल्या दुचाकी मालकांनी पोलीसांशी संपर्क सुरू केला होता.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here