जत,प्रतिनिधी :भारतीय आयुर्विमा कंपनी जत शाखेचे शाखाधिकारी शंशिकात दाभाडे यांचा डफळापूर येथील श्री. दत्त पतसंस्थेस भेट दिली.यावेळी त्यांच्या सत्कार करण्यात आला.
यावेळी बोलताना श्री.दाभाडे म्हणाले,ग्रामीण भागात दत्त पतसंस्थेचे केलेला व्यवसाय, विस्तार व कामकाज कौतुकास्पद आहे.पतसंस्थेचे कर्ज वाटप,वसूली,ठेवी,कामकाज यांचा समन्वय संस्थेचा भविष्याकाळ उज्वल करणारा आहे.यावेळी जेष्ठ नेते सुभाषराव गायकवाड,व विमा एंजन्ट भाऊ वठारे यांचाही सत्कार करण्यात आला.चेअरमन बाबासाहेब माळी,संकेत टाइम्सचे संपादक राजू माळी,युवा नेते विजय संकपाळ,सचिव राजेंद्र पोतदार,अभिजित माळी व कर्मचारी उपस्थित होते.
डफळापूर : येथील श्री.दत्त पतसंस्थेच्या वतीने एलआसीचे शाखाधिकारी शंशिकात दाभाडे यांचा सत्कार करण्यात आला.





