उमदीत मटका अड्यावर छापा:तिघे ताब्यात, एक फरारी

0
9

जत,प्रतिनिधी : उमदी(ता.जत)येथे दोन ठिकाणी चालू असलेल्या बेकायदा मटका अड्ड्यावर छापा टाकून मटका बुकीसह तिघांना पोलीसांनी ताब्यात घेतले, तर एक फरार झाला आहे.उमदी पोलिस, विशेष पोलिस पथक सांगली यांनी ही कारवाई केली.

याबाबत अधिक माहिती अशी,खबऱ्याकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे मंगळवारी दुपारी उमदी-चडचडण रोडवरील शिवाजी हायस्कूल पाठीमागे मटका घेणाऱ्या राजेंद्र रघुनाथ शिंदे यांंच्या मटका अड्ड्यावर छापा टाकला,तेथे अडतीस हजार रोख,दोन मोबाईल,एक स्प्लेंडर मोटरसायकल जप्त केली.तर दुसऱ्या कारवाईत महादेव लक्ष्मण चव्हाण यांच्याकडे दोन हजार दोनशे रूपये,जुगाराचे साहित्य जप्त केले.

मात्र महादेव फरारी झाला.मंगळवारी सायंकाळी सातच्या दरम्यान विशेष पोलिस पथकाने हि कारवाई केली.याप्रकरणी संभाजी तुकाराम कदम,संजू सिद्राया पुजारी यांना ताब्यात घेतले.अधिक तपास कॉन्टेबल वळसंग करत आहेत.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here