जत शहरात पावनेदोन कोटीच्या विकास कामांना प्रांरभ

0
10

जत,प्रतिनिधी : जत नगरपरिषदेच्या वतीने प्रभाग क्र.1,प्रभाग क्र.4,प्रभाग क्र.6 येथे दलीतवस्ती सुधार योजनेतून 1कोटी 80 लाख निधीतील गटारी कामाचे उद्घाटन करताना जिल्हा परिषद सदस्य तथा जिल्हा बँकेचे संचालक विक्रम सावंत यांच्या हस्ते झाले.गेल्या वर्षभरातील ही सर्वात मोठी विकास कामे सुरू झाली आहे.गतवर्षी कॉंग्रेस,राष्ट्रवादीचे आघाडीची नगरपरिषदेवर सत्ता आली होती.शहरात मोठ्या प्रमाणात विकास कामे करणे गरजेचे आहे.रस्ते, गटारी, नाले दुरूस्ती महत्वपूर्ण ठरली आहे.आता गटारी कामाला सुरूवात झाल्याने  विकास कामात गती येणार आहे.यावेळी माज़ी पं.स.सभापती बाबासाहेब कोडग,काँग्रेस,राष्ट्रवादी व बसपा युतीचे नगराध्यक्ष,उपनगराध्यक्ष,सभापती सर्व नगरसेवक पदाधिकारी, ग्रामस्थ उपस्थित होते.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here