डफळापूर, वार्ताहर : येथील रामोशी वस्तीतील संस्थानकालीन श्री.परमानंद मंदिराचा जीर्णोद्धार व महादेवाची पिंड व नंदीची स्थापना करण्यात आली.बेंळूखी रोड नजिक रामोशी वस्तीत हे ऐतिहासिक संदर्भ असणारे मंदिर आहे.अनेक वर्षांपासून ते दुर्लक्षित राहिले होते. हेमाडपंती बांधकामाचा आदर्श नमुना असलेल्या मंदिराचा थेट डफळे संस्थांशी संबंध आढळतो. मंदिरानजीक असणारे भुयार हे राजवाड्यापर्यंत असल्याचे जुने लोक सांगतात.अजूनही मंदिर परिसरात त्यांचे अवशेष आहेत. मंदिराचे बांधकाम दगडी असून जुन्या पद्धतीचे आहे.कोळी समाजाचे आराध्य दैवत असणाऱ्या या मंदिराची पडझड झालेली होती.येथील व्यापारी अशोक कोरे यांच्या पुढाकाराने लोकवर्गणीतून मंदिराचे बांधकाम करण्यात आले.मंदीराच्या मुख्य गाबऱ्याची दुरुस्ती करण्यात आली आहे. रंगरंगोटी, पडलेल्या भिंती नव्याने बांधण्यात आल्यात. तेथे श्री. महादेवाची पिंड व नंदी प्रतिंष्ठापना करण्यात आली तत्पूर्वी दोन्ही मूर्तींच्या गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आल्या. धार्मिक विधीवत पूजा-आर्चा करून मंत्रघोषात बापू स्वामी यांनी मुर्तींची स्थापना केली.यावेळी अभिषेक, धार्मिक विधी व महाप्रसादाचे आयोजन केले होते.मोठ्या संख्येने भाविकांनी दर्शन घेतले.
डफळापूरातील ऐतिहासिक परमानंद मंदिरात मुर्ती प्रतिष्ठापना करण्यात आली.





