संख,वार्ताहर : संख(ता.जत)येथे तीव्र पाणी टंचाई असतानाही भष्ट्राचार व राजकीय वादात गावाला महत्वाच्या असणारी राष्ट्रीय पेयजल योजना पुर्ण करावी,त्यातील भ्रष्टाचार प्रकरणी दोषी,अधिकारी,कंत्राटदारावरांसह संबधितावर फौजदारी कारवाई या मागणीसाठी संख येथील स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीन जिल्हा परिषदेसमोर मंगळवारपासून आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
संखकरांना मुबलक पाणी पुरवठा करण्यासाठी शासनाने सुमारे साडेचार कोटीचा निधी देऊन पेयजल योजना दिली,योजनेचे काही प्रमाणात काम करण्यात आले आहे. तीन कोटीचा निधीही खर्ची पडला आहे.तरीही गेल्या आठ वर्षापासून योजना बंद आहे.योजनेचे काम निकृष्ठ झाले आहे,मोठ्या प्रमाणात यात भष्ट्राचार झाला आहे.त्यांची चौकशी करावी अशी मागणी स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने यापुर्वी संबधित विभागाकडे केली होती.मात्र चौकशीस टाळाटाळ केल्याने त्यांनी सांगलीत जिल्हा परिषदेसमोर आमरण उपोषण सुरू केले आहे. संखसाठी आठ वर्षांपूर्वी राष्ट्रीय पेयजल या योजनेतून पाणी पुरवठा योजना सुरू करण्यात आली आहे.ती आजतागायत पूर्ण झाली नाही.योजनेच्या कामात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे. कोणतीही कामे नियमानुसार नाहीत,खोटी मानपुस्तके करून बिले काढली आहेत.नियम तोडून बिलाचे वितरण केले आहे.टेंडर न करता रोजगार हमी योजनेच्या एका मजूराच्या नावावर योजनेची तीन कोटीची कामे दिले आहेत. या सर्व बाबी संशयास्पद आहेत. भ्रष्टाचार झाल्याचे बरेचसे मुद्दे समोर अाहेत.आम्ही रीतसर संबंधित विभागाला याची चौकशी व्हावी अशी मागणी केली असूनही अद्याप त्यावर कारवाई झाली नाही.त्यामुळे या प्रकरणाला काही अधिकारीच पाठीशी घालत असण्याची शक्यता नाकारता येत नाही.पाणी योजना अर्धवट राहिल्याने नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्यासाठी सुद्धा विकतचे पाणी घ्यावे लागते आहे. शुद्ध पाण्याचा मोठा प्रश्न संखमध्ये आहे.शासनाने कोट्यावधीचा निधी देऊन ही योजना रखडली आहे.त्याची चौकशी होत नाही,काम सुरू होत नाही.त्यामुळे आम्ही पुढील कारवाई झाल्याशिवाय उपोषण माघार घेणार नसल्याचे उपोषण कर्त्यांनी सांगितले.स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष महावीर पाटील,रमेश माळी,शाखाध्यक्ष नागनाथ शिळीन,विश्वनाथ बिराजदार,भिमराव बिराजदार,भिमाशंकर बिराजदार,विठ्ठल कुंभार,श्रीशैल कनमडी,रावसाहेब शिळिन,भिमगोंडा बिराजदार,रमेश हडपद,सिदमल्ला जनगोंड,प्रंशात सिरगोंड,संगमेश बिरादार,मंजूनाथ शिळिन,हणमंतराया बिराजदार आदी कार्यकर्ते,ग्रामस्थ उपोषणास बसले आहेत.
संख,पेयजल पाणी पुरवठा योजनेची काम पुर्ण व्हावे,भष्ट्राचाराची चौकशी व्हावी या मागणीसाठी स्वा.शेतकरी संघटनेच्या वतीने जि.प.सांगली येथे आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.





