जत | पतसंस्था,ठेकेदार,धर्मादाय संस्थांनी मदतीसाठी पुढाकार घ्यावा |

0
1

जत,प्रतिनिधी : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक बांधिलकी व सामाजिक उत्तरदायित्व म्हणून सर्व राज्यांतील धर्मादाय संस्थांनी (ट्रस्ट) गरजूंना मदत करण्याचे आवाहन राज्याच्या धर्मादाय आयुक्तांनी केले आहे.

त्या धर्तीवर जत तालुक्यातील मोठ्या राजकीय नेते,पदाधिकारी, पतसंस्था,ट्रस्ट,सेवाभावी संस्था,मोठ्या संख्येने असलेले विविध क्षेत्रातील ठेकेदारांनी आता अडचणीच्या काळात गरजूंना मदत करण्यासाठी पुढे यावे अशी मागणी होत आहे.

सध्या राज्यामध्ये कोरोना (कोविड-19) या विषाणूच्या फैलावामुळे जगातील इतर देशांप्रमाणे परिस्थिती निर्माण झाली असून त्याचा सामना करण्यासाठी केंद्र शासन तसेच राज्य शासन सर्वतोपरी उपाययोजना करीत आहे. लॉकडाऊनमुळे महाराष्ट्रात निर्माण झालेली परिस्थिती लक्षात घेता गरीब व कष्टकरी तसेच मजूर यांच्या दैनंदिन गरजा भागविण्यासाठी त्यांना जीवनावश्यक वस्तू, अन्नधान्य आणि औषधोपचार पुरविण्याची तसेच पंतप्रधान सहायता निधी आणि मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये आर्थिक स्वरूपात मदत करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा परिस्थितीत शासन सर्व उपाययोजना करीत आहेत. याकरिता धर्मादाय संस्था अथवा ट्रस्ट,सेवाभावी संस्था,पतसंस्था,ठेकेदारांनी पुढाकार घेणे गरजेचे आहे. त्यामुळे पीडितांना आणि गरजूंना मदत होणार आहे. शासनाने घोषित केलेल्या लॉकडाऊन बंधनाच्या अधीन राहून, आरोग्यविषयक मार्गदर्शन तत्त्वांचे पालन करून तसेच जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक, तहसीलदार या शासकीय यंत्रणांशी समन्वयाने व परवानगीने गरजूंना व पीडितांना या संस्थांनी मदत करण्याची गरज आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here