डफळापूर,वार्ताहर : येथील सुसाट व उघड्यावरील मटका अड्ड्यावर जत पोलीसांनी छापा टाकला. त्यात सचिन छत्रे या मटका एंजन्टाला पोलीसांनी ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडे मटक्याच्या चिठ्यासह 7 हजार 135 रुपयाचा मुद्देमाल जप्त केला आहे. डफळापूर परिसरात मटका एंजन्टाची मुजोरी वाढली होती.गावातील एक चौक मटका चौक म्हणून परिचित झाला आहे.मुख्य बाजार पेठेतील या चौकातील सिद्धनाथ देवाचे मंदिर आहे.त्यांच्या वरच्या कठड्यावर मटक्याच्या चिठ्ठ़्या ठेऊन थेट उघड्यावर मटका घेतला जात होता.काही नागरिकांनी थेट पोलीस ठाण्यात तक्रारी केल्या होत्या.त्यापार्श्वभुमीवर जत पोलीस ठाण्याचे सा.पो.निरिक्षक रणजित गुंडरे,हवलदार पवार,कॉन्टेबल अमोल चव्हाण, सचिन हाक्के यांच्या पथकाने छापा टाकला. त्यावेळी मटका घेत असलेल्या सचिन छत्रे याला रंगेहाथ पकडले. त्यांच्या बरोबरचे अन्य एंजन्टांनी धुम ठोकल्याने त्यांना पकडता आले नाही.मात्र यापुढे डफळापूरचा मटका अड्ड्यावर कारवाया सुरू राहतील असे यावेळी गुंडरे यांनी सांगितले.
दरम्यान सांगली येथील दोन बुकीकडून गुगवाड, डफळापूर, बाज पर्यत सर्व गावात एंजन्टांचे जाळे विणले आहे.दररोज पाच लाखावर मटक्याचा धंदा बळावला आहे.गुगवाड,डफळापूरात मटक्याचे मोठ्या प्रमाणात जाळे विणले आहे. स्टँडनजिकच्या पानपट्ट्या, बाजार पेठेतील चौक,बियरबार पाठीमागे हे अड्डे राजरोसपणे सुरू आहेत. त्यात युवा पिठीसह,शाळकरी मुले,महिलाही यात अडकल्या आहेत.अनेकांनी घरे,जमिनी या मटक्यात विकल्या आहेत.संसार धुळीस मिळाले आहेत.यापुढे डफळापूरतील मटक्यासह,पत्याचे क्लब, दारूचे अड्डे बंद करावेत अन्यथा रस्त्यावर उतरू असा इशारा युवा नेते सुनिल छत्रे यांनी दिला आहे.