तुकाराम महाराजांचे कार्य कौतुकास्पद : गोपीचंद पडळकर

0
1

संख,वार्ताहर :संख (ता.जत ) गोंधळेेवाडीचे तुकाराम महाराज हे भुयार ता. मंगळवेढा मठाचे मठाधिपती  आधुनिक 21 व्या शतकातील खरे संत आहेत. त्यांनी हाती घेतलेले काम कौतुकास्पद आहे,असे मत धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी शुक्रवारी गोधळेंवाडी येथे व्यक्त केले.पडळकर यांनी तुकाराम महाराज यांच्या गोंधळेवाडी मठास भेट दिली.

पडळकर म्हणाले,तुकाराम महाराज यांनी संघर्ष दुष्काळाचा या उपक्रमांतर्गत 158 दिवस दुष्काळातील लोकांसाठी लोकांसमवेत कार्य करण्याचे ठरविले आहे. तसेच जत पूर्व भागात दुष्काळात जनता होरपळत आहे अशा परिस्थितीत आपणच आपल्या लोकांना आधार दिला पाहिजे.आपल्याच मातीत झगडणाऱ्या शेतकऱ्यांसाठी कार्य करणे गरजचे आहे या भावनेतून तुकाराम महाराज कार्य करत आहे.जत पूर्व भागात दुष्काळाची परिस्थिती अंत्यत गंभीर आहे.अशा भीषण परिस्थितीत महाराजांनी या भागात पाच हजार जनांवरांची सोय होईल असा मोफत चारा उभा करण्याचे कार्य त्यांनी हाती घेतले आहे. पाणी व चारा दोन प्रमुख समस्या या भागात जाणवत आहे.दानसूर लोकांनी एकत्र येऊन या समस्येवर मात करणे गरजचे आहे. तुकाराम महाराज यांनी पुढाकार घेतला आहे.त्यांना आमचे सहकार्य नेहमीच असणार आहे.इतरांनीही सहभाग घ्यावा. दुष्काळावर मात करण्यासाठी महाराजांच्या कार्यात सक्रीय सहभाग असेल असे पडळकर म्हणाले.सामाजिक बांधिलकी,माणुसकी म्हणून तुकाराम महाराजांच्या कार्याचा आदर्श समाजातील इतर लोकांनी घेऊन दुष्काळात सढळ हातांनी मदत करून महाराजांच्या कार्यात हातभार लावणे गरजचे आहे. तुकाराम महाराज हे कुठल्याच व्यक्तीकडून आर्थिक स्वरूपात मदत न घेता कामाच्या स्वरूपात मदततीची मागणी करतात. देणगी पावती न करता निस्वार्थी मनाने कार्य करत आहेत असे पडळकर म्हणाले.

गोंधळेवाडी ता.जत येथे युवा नेते गोपीचंद पडळकर यांचा सत्कार करताना तुकाराम महाराज,चंद्रकात गुड्डोडगी व मान्यवर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here