जत,(प्रतिनिधी):आपल्या पोरीला मारहाण केली म्हणून जावयाला लोखंडी खांबाला बांधून सासऱ्याने जबर मारहाण केली .यात जावयाचा मृत्यू झाला. ही धक्कादायक घटना मिरज तालुक्यातील सावळी येथे घडली. ज्ञानेश्वर गोपाळ बामणे (वय-40) असे या जावयाचे नाव असून तो जत तालुक्यातील बसर्गीचा आहे. या घटनेमुळे बसर्गी परिसरात खळबळ उडाली आहे.ही घटना मिरज तालुक्यातील सावळी येथे शनिवारी पहाटे तीन वाजता घडली. मृत ज्ञानेश्वरने लोखंडी पाईप डोक्यात घातल्याने त्याची पत्नी गीतांजली (30) ही देखील मोठी गंभीर जखमी आहे.