जत,प्रतिनिधी: पाणी टंचाईने व्याकुळ झालेल्या कंठी येथील शेतकऱ्यांनी थेट म्हैसाळ योजनेचा कँनॉल फोडल्याने सुमारे 40 शेतकऱ्यांवर जलसंपदा विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
याबाबतची फिर्याद कार्यकारी अभिंयता विजय पाटील यांनी जत पोलीसात दिली.रघूनाथ गोंविद नरळे,शरद हिप्परकर,महावीर नरळे,सह कंठी येथील चाळीस शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला आहे.
म्हैसाळ योजनेचा मुख्य कालवा कंठी परिसरातून जातो.कालव्यातून बनाळी,वाळेंखिडी, येळवी व पुढे सांगोल्याकडे पाणी सोडले जात आहे.सध्या तीव्र पाणी टंचाई आहे. त्यामुळे शेतकऱ्यांची पिके वाळू लागली आहेत.त्यामुळे वैतागलेल्या कंठी येथील शेतकऱ्यांनी सा.क्र.33/300 या कालव्याचा भराव फोडून पाणी कालव्याबाहेर सोडले.यांची माहिती लागताच जलसंपदा विभागाचे कार्यकारी अंभियता विजय पाटील यांनी घटनास्थंळी भेट देत जत पोलीस ठाणे गाठले.तेथे सुमारे 40 शेतकऱ्यांवर शासकीय कामात अडथळा आणून मालमत्तेचे नुकसान केल्याची फिर्याद दिली.त्यात शनिवार पहाटे पासून रविवर सांयकाळ चार पर्यत गेलेले पाण्याचे दोन लाख कालव्याचा बांधाचे असे 2 लाख 29 हाजाराचे नुकसान झाल्याचे म्हटले आहे.जत पोलिसात या शेतकऱ्यां विरूध गुन्हा दाखल झाला आहे.