जत,प्रतिनिधी : अचकनहळ्ळी (ता.जत) गावात विहिरीतील गाळ काढत असताना यारीच्या बकेटमधील दगडे डोक्यात पडून एका कामगारांचा जागीच ठार झाला.तर तिघे जखमी झाले. चंद्रकांत श्रीधर पाटील (वय 38, रा.बनाळी) असे मृताचे नाव आहे. रविवारी दुपारी 1.30 वाजता ही घटना घडली.यात सचिन पाटील, नानासो सावंत, ईश्वर साळुंखे अशी जखमी झालेल्या कामगारांची नावे आहेत. याबाबत जत पोलिस ठाण्यात धुंडय्या स्वामी यांनी फिर्याद दिली आहे.अधिक माहिती अशी, अचकनहळ्ळी गावात मनोज शिंदे यांच्या विहिरीतील गाळ काढण्याचे काम सुरू आहे. रविवारीही सकाळपासून यारीद्वारे चार काम सुरू होते. दुपारी 1.30 वाजता यारीद्वारे गाळ भरलेल्या बकेटवर्ती उचलत असताना पलटी झाल्याने त्यातिल दगड खाली विहिरीत कोसळले.खाली काम करत असलेल्या कामगारांच्या अंगावर थेट दगडे पडली.चंद्रकांत पाटील यां कामगारांच्या डोक्यात दगड पडला.डोक्याला गंभीर इजा झाल्याने त्यांचा जागीच मृत्यु झाला. तर इतर तिघांच्या अंगावर ही दगड कोसळल्याने ते किरकोळ जखमी झाले आहेत.त्यांच्यावर जत ग्रामीण रुग्णालयात उपचार करण्यात आले. याची नोंद जत पोलिस ठाण्यात झाली असून याचा तपास उपनिरीक्षक आप्पासो कत्ते करत आहेत.