जत,प्रतिनिधी : जत तालुक्यात भयानक पाणी टंचाई जाणवत असताना शासन फक्त कागदी घोडे नाचवत आहे. प्रशासकीय अधिकारी उपाययोजना केल्याचे सांगत आहेत.परंतु प्रत्यक्षात कोणत्याच उपाययोजना करण्यात आलेल्या नाहीत.मागणी करुनही एकाही गावात पिण्याच्या पाण्याचा टँकर सुरू करण्यात आला नाही.तालुका प्रशासनाने येत्या 30 नोव्हेंबरपर्यंत आवश्यक असणाऱ्या ठिकाणी पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू करावेत.तसेच पंढरपूर-विजापूर रोडचे उमदीपासून पुढे रखडले आहे.ते व दुष्काळी योजना तातडीने द्याव्यात अशी मागणी शेतकरी संघर्ष समितीच्या वतीने संजय तेली यांनी केली.
तालुक्याच्या पूर्व भागात भयानक दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्या भागाची पाहणी करून त्याची माहिती शासनाला कळवीने आवश्यक कळवावी.त्याशिवाय या भागाचा दुष्काळ हटणार नाही.पशुधन जगविण्यासाठी शासनाने चारा छावण्या किंवा थेट अनुदान देणे आवश्यक आहे. परंतु शासनाने त्या संदर्भात अद्याप कोणतीच उपाययोजना केलेली नाही.नागरिकांनी पिण्याच्या पाण्याचे टँकर मागणी करूनही अद्याप टँकर सुरू करण्यात आलेले नाहीत.त्यामुळे नागरिकांना पाण्यासाठी पायपीट करावी लागत आहे.त्यामुळे पिण्याच्या पाण्याचे टँकर तात्काळ सुरू करावेत अशी मागणीही तेली यांनी निवेदनद्वारे केली आहे. यासंदर्भात प्रांताधिकारी व तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले.