जत,प्रतिनिधी : जत तालुक्यातील पांढरेवाडी परिसरातील नदीपात्रातील बेकायदा वाळू तस्करी करणाऱ्या वाहनावर कारवाई करत असताना तलाठी गणेश संपतराव चव्हाण यांना जीवे मारण्याची धमकी देत पकडलेले दोन ट्रक्टर पळवून नेहले होते.याप्रकरणी उमदी पोलीसात मनोहर तमण्णा चव्हाण(रा.जालीहाळ खुर्द),भागाप्पा उर्फ म्हातारबा तांबे (रा.पांडरेवाडी),संभाजी करे (रा-जालीहाळ), देवाप्पा पुनाप्पा तांबे (रा पांडरेवाडी, ता.जत) व अन्य तिघे अशा सात जणाविरोधात तलाठी चव्हाण यांनी फिर्याद दिली होती.घटना 20 नोव्हेंबरला मध्यरात्री घडली होती.शासकीय कामात अडथळा,कर्मचाऱ्यास धमकी आदी प्रकारचा गुन्हा उमदी पोलीसात दाखल झाला होता.यातील दोन संशियताना पोलीसांनी अटक केली आहे.
अधिक माहिती अशी,पांढरेवाडी परिसरातील बोर नदीपात्रातून वाळू तस्करी रोकण्यासाठी प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्या पार्श्वभूमीवर तलाठी गणेश चव्हाण यांचे पथक नदीपात्रात गस्त घालत होते.त्यादरम्यान संख-करेवाडी जाणाऱ्या रोडवर बेकायदेशीर वाळू तस्करी करणारे दोन ट्रक्टर आढळूंन आले.त्यांचा चव्हाण यांच्या पथकाने पकडले असता, वाळू तस्करी करणाऱ्या सात जणांनी बिगर नंबर प्लेटच्या मोटारसायकलीवरून येऊन तलाठी चव्हाण यांच्या आडवी दुचाकी लावत धक्काबुक्की करत काठ्या,दगडांचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत नंबर नसलेले दोन ट्रक्टर पळवून नेहले होते.त्यात दोन लाख 98 हाजार 950 रूपये किंमतीची दोन ब्रास वाळू पळवली.याप्रकरणी मनोहर तमण्णा चव्हाण व भागाप्पा उर्फ म्हातारबा तांबे या दोन संशियत आरोपींना शुक्रवारी अटक केली. त्यांचेकडून एक ट्रॅक्टर व एक ब्रास वाळू असा 1 लाख 49 हजार 475 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.ताब्यातील संशियताकडून अन्य अरोपीचा तपास सुरू आहे.अधिक तपास सा.पो.निरिक्षक भगवान शिंदे करत आहेत.