जलयुक्त शिवार योजना 2018-19 मध्ये | सांगली जिल्हा राज्यात प्रथम |

0
7


– 2700 पैकी 1562 कामे पूर्ण
– 722 कामे प्रगतीपथावर
– पूर्ण, प्रगतीपथावरील कामांची टक्केवारी 85 टक्के
सांगली : शाश्वत पाणीसाठे निर्माण करून टंचाईवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्याच्या दृष्टीने गेल्या चार वर्षापासून सुरु करण्यात आलेल्या जलयुक्त शिवार योजनेत चालू आर्थिक वर्षात सन 2018 – 19 मध्ये सांगली जिल्ह्याने राज्यात प्रथम स्थान पटकावले आहे. दुसऱ्या स्थानी सातारा, तिसऱ्या स्थानी सिंधुदुर्ग आहे. जिल्हाधिकारी वि. ना. काळम यांच्या मार्गदर्शनाखाली विविध यंत्रणांनी समन्वयाने केलेल्या कामातून मिळालेले हे यश आहे.

याबाबत जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, सन 2018 – 19 या आर्थिक वर्षात सांगली जिल्ह्यात 103 गावात हे अभियान राबवण्यात येत आहे. या वर्षात आतापर्यंत एक हजार 562 कामे पूर्ण झाली असून, 722 कामे प्रगतीपथावर आहेत. प्रगतीपथावरील कामे आणि पूर्ण झालेल्या कामांची टक्केवारी 85 टक्के आहे. उर्वरित 15 टक्के कामांमध्ये अनेक ठिकाणी सध्या पाणी असल्याने कामे करण्यात अडचण येत आहे. तरीदेखील ही कामे विहित मुदतीत पूर्ण केली जातील.
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, सांगली जिल्ह्यात या वर्षी प्रस्तावित आराखड्यानुसार 2700 कामे आहेत. त्यासाठी 35 कोटी रुपये निधीची तरतूद करण्यात आली आहे. या सर्व 2700 कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. यापैकी एक हजार 562 कामे पूर्ण झाली आहेत, 722 कामे प्रगतीपथावर आहेत. अशी दोन हजार 284 कामे आहेत. कामांची ही टक्केवारी 85 टक्के असून,
जिल्हाधिकारी वि. ना. काळम म्हणाले, जलयुक्त शिवार अभियान ही योजना तर शासनाची प्राधान्यक्रमाची आणि महत्त्वाकांक्षी योजना आहे. सांगली जिल्ह्यात गत चार वर्षांमध्ये जलयुक्त शिवार अभियानातून अनेक कामे झाली आहेत. त्याचे चांगले परिणाम जिल्ह्यात दिसत आहेत. दोन दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी पावसामुळे यातील बऱ्याचशा कामांमध्ये पाणीसाठा झालेला आहे. या पाण्याचा फायदा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी नक्की होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.


Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here