डफळापूर | कुडणूर, शेळकेवाडी पाणी योजनाची पाणी पुरवठा विभागाच्या अभिंयत्याकडून पाहणी |

0
6

डफळापूर,वार्ताहर: जत पश्चिम भागातील डफळापूर,कुडणूर,शेळकेवाडी गावातील पाणी टंचाईच्या पाश्वभूमीवर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अभिंयता श्री. सोनवने यांनी पेयजल पाणी पुरवठा योजनाची पाहणी केली.त्यात डफळापूर पाणी योजनेच्या कामाच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.कुडणूर मधील टाकीचे काम पुर्ण करून ग्रामस्थांना पाणी सोडण्याची सुचना केली.शेळकेवाडी पाणी योजनेच्या अपुऱ्या कामाबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत रखडलेले काम 15 डिंसेबर पर्यत पुर्ण करावे अन्यथा कारवाई करू असा इशारा सोनवने यांनी संबधिताना दिला.यावेळी जिल्हा परिषद सदस्य महादेव पाटील, पंचायत समिती सदस्य दिग्विजय चव्हाण,अभिंयता श्री.कोराळे श्री.खाडे,शाखा अभिंयता श्री.माळी उपस्थित होते.

टंचाई काळात या गावांना पाणी टंचाई भासू नये यासाठी पाटील, व चव्हाण यांनी पाणीपुरवठा विभागाकडे पाणी योजनेची कामे पुर्ण करून नागरिकांना उपलब्धं करून देण्याची सुचना मांडली होती.त्या पाश्वभूमीवर मंगळवारी सोनवने यांनी तिन्ही योजनाच्या विहिर,पाईपलाईन,टाक्या सह विविध अंगाची पाहणी केली.डफळापूर पाणी योजनेचे काम गतीने सुरू आहे. बसाप्पावाडी ते एकविरा माळ येथपर्यतच्या पाईपलाईन मधून मंगळवारी पाणी सोडण्यात आले.महत्वकांक्षी योजनेचे पाणी डफळापूर हद्दीत आले आहे. यापुढचे काम गतीने पुर्ण करावे.त्याशिवाय वाड्यावस्त्यां,गावभागातील कामे करून तातडीने पाणी उपलब्धं करून देण्याचे आदेश यावेळी सोनवने यांनी दिले.

डफळापूर, कुडणूर,शेळकेवाडी पाणीपुरवठा योजनाची पाहणी करताना मुख्य का.अभिंयते श्री.सोनवने, महादेव पाटील, दिग्विजय चव्हाण, डफळापूर योजनेचे पाणी एकविरा माळपर्यतच्या टाकीपर्यत आले आहे.

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here