करजगी,वार्ताहर: जत तालुक्यातील करजगी येथील मुरगेंद्रय्या मठपती यांच्या राहत्या घरात गँसचा स्फोट होऊन दोन लाखाचे नुकसान झाले.सुदैवाने सर्वजण घराबाहेर पडल्याने जिवीतहानी टळली.
शुक्रवारी सकाळी मुरगेंद्रय्या यांच्या पत्नी स्वंयपाक करून घराबाहेरील काम करत असताना लिकेज झालेल्या गँसचा अचानक स्फोट झाला.
हेही वाचा: 18 वर्षे तळ ठोकलेल्या अभिंयता शेखच्या भष्ट्राचाराच्या चौकशीसाठी उपोषण
त्यात घराला आग लागल्याने सर्व साहित्य भस्मसात झाले. घराचे,रोख रक्कम, दीड तोळे सोने,संसासउपयोगी साहित्य व शैक्षणिक कागदपत्रे जळाली आहेत.एकूण 2 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. गावकामगार तलाठी,संरपच,पोलीस पाटील यांनी घटनास्थंळी भेट देऊन पंचनामा केला.दरम्यान मठपती कुंटुबिय या घटनेमुळे उघड्यावर आले आहे. त्यांना शासन व दानसुरांनी मदत करावी अशा अपेक्षा आहेत.
करजगी येथील मुरगेंद्रय्या मठपती यांच्या गँस स्फोटात जळालेले घर





