जत,(प्रतिनिधी):सांगली जिल्हा काँग्रेस सेवादलाच्यावतीने माजी पंतप्रधान पंडित नेहरू आणि माजी मुख्यमंत्री पद्मभूषण वसंतदादा पाटील यांच्या जयंतीनिमित्त रविवारी (ता.18) सेवादल पुरस्कारांचे वितरण सांगलीच्या दीनानाथ मंगेशकर नाट्यगृहात दुपारी चार वाजता आयोजित करण्यात आले आहे. युवा साहित्य अकादमी पुरस्कारप्राप्त नवनाथ गोरे आणि दैनिक महासत्ताचे पत्रकार आणि लेखक मच्छिंद्र ऐनापुरे यांना साहित्यरत्न पुरस्काराने गौरवण्यात येणार आहे.
हेही वाचा: सुभेदार बाळासो सोनलकर अंनतात विलिन, हिवरे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
जिल्हा काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष अजित ढोले व प्रकाश जगताप यांनी माहिती देताना सांगितले की, यावर्षी पत्रकार मधुकर भावे, प्रतापशेठ साळुंखे,खानापूर (जीवनगौरव),श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र,सांगली ( आदर्श संस्था), लठ्ठे एज्युकेशन सोसायटी,सांगली ( आदर्श शैक्षणिक संस्था), सांगली जिल्हा देवदासी संघटना (आदर्श सामाजिक संघटना), डॉ. रवी जाधव (आदर्श धन्वंतरी), गौतम पाटील( विशेष सत्कार), सर्जेराव गायकवाड, सांगली( कलाभूषण), प्रशांत जगताप,सांगली (कलारत्न), नवनाथ गोरे, मच्छिंद्र ऐनापुरे,(जत), विजय कोष्टी,कवठेमहांकाळ (साहित्यरत्न), हणमंत मोरे,पंढरपूर,खंडेराव हेरवाडे,शिरोळ(समाजभूषण), सुनील शेडबाळे,मालगाव व उमेश पाटील,घाटनांद्रे (समाजरत्न), सौ.आरती गुरव, हरिपूर (आदर्श उद्योजक), डॉ.मल्लिकार्जून टोणपे,सांगली , श्रीकृष्ण मोहिते,सांगलीवाडी, डॉ. संतोष माने,पलूस( आदर्श शिक्षक), अॅड्. अशोक शेलार,सांगली( आदर्श विधीसेवा), संयोगीता पाटील केंब्रीज स्कूल,मिरज (आदर्श शाळा), राही सरनोबत, हणमंत जाधव, ( क्रीडाभूषण), अतुल फासे,विटा, रवींद्र पवार,विटा, गौरव जाधव,सांगली (क्रीडारत्न) पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे.अखिल भारतीय काँग्रेस सेवादलाचे अध्यक्ष लालजी देसाई यांच्याहस्ते वितरण होईल. प्रदेशाध्यक्ष विलास औताडे, काँग्रेस प्रवक्ते रत्नाकर महाजन, प्रभारी मंगलसिंह सोळंकी, माजी मंत्री प्रकाश आवाडे, सह प्रभारी शंकरगौडा पाटील, आमदार आनंदराव पाटील, सहसचिव संग्राम तावडे, प्रदेश सचिव प्रकाश सातपुते पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत. आमदार मोहनराव कदम, विश्वजीत कदम, माजी मंत्री प्रतिक पाटील, विशाल पाटील, शैलजा पाटील, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील यांची उपस्थिती राहणार आहे.