सर्वोत्तम जीवन जगण्यासाठी धम्मविचार आचरणात आणा : विजय गायकवाड

0
4

गुगवाड,वार्ताहर:गुगवाड (ता.जत)येथील कालकथित अथर्व सांगलिकर यांच्या जन्मदिननिमित्त इ.दहावीची परिक्षा विषेश प्राविण्यासह उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याचा गुणगौरव पारितोषिक वितरण समारंभ व धम्मसंस्कार शिबीर उत्साहात संपन्न झाले.

या कार्यक्रमाचे आयोजन व अध्यक्ष अँड सि.आर.सांगलिकर होते.प्रमुख पाहुणे म्हणून प्राताधिकारी तुषार ठोंबरे,सांगली कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनकरराव पाटील,पंचायत समिती सभापती सौ.सुशीला तांवशी उपस्थित होते. प्रांरभी बुद्ध, बसव,बाबासाहेब आंबेडकर व अथर्व सांगलिकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार व द्विप प्रज्वलन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. बिळ्ळुर जि.प.गटातील सर्व माध्यमिक विद्यालयातील क्रमांक 1,2,3, अशा विशेष प्राविण्य मिळविलेल्या प्रत्येक शाळेतील पहिल्या तिन विद्यार्थ्याचा पारितोषिक,स्मृतीचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.तुषार ठोंबरे म्हणाले,सि.आर.सांगलिकर हे आगळवेहळ व्यक्तिमहत्व आहेत.गुगवाड सारख्या दुभाषिक गावात त्यांनी शैक्षणिक क्रांती घडवत सुसज्ज विद्यालय उभे केले आहे.यांचा फायदा घेऊन या परिसरातील विद्यार्थ्यांनी सर्वोत्तम यश मिळवावे.अधिकारी घडतील अशा पध्दतीचा शैक्षणिक माहोल  येथील विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणारा आहे.

 हेही वाचा: 

संख व्यापारी ग्रा.बि.शेती सह.पतसंस्था संखचा दिमाखदार शुभारंभ सोहळा संपन्न

सि.आर.सांगलिकर म्हणाले,मी शिक्षण घेत असताना मोठा संघर्ष केला आहे.त्यांचे स्मरण ठेवत गावात शाळा काढली आहे.यापुढे कोणत्याही  विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी आमची शाळा प्रयत्न करत आहे.गुगवाड व परिसरातील विद्यार्थी पुढे  कलेक्टर,तहसीलदार असे मोठे अधिकारी झाले  पाहिजेत अशी शिक्षण पध्दत येथे  उपलब्ध केली आहे.माध्यमिक, ज्यू कॉलेज,स्पर्धा परिक्षा केंद्र येथे सुरू केले आहे. खेडे गावातील विद्यार्थी अधिकारी,उद्योगपती झाला पाहिजे.माझी मुले म्हणून मी शाळेतील विद्यार्थ्यांना पाहतोय.असेही शेवटी सांगोलकर  म्हणाले,

हेही वाचा : तालुकाभर अवैद्य धंद्याना उधान,पोलीस गांधारीच्या भुमिकेत:सर्वच धंदे जोमात

धम्मसंस्कार शिबीर मध्ये बोलताना भन्ते विमलकिती गुणसिर नागपूर बुद्ध व धम्म संस्काराची गरज या विषयावर व्याख्यान दिले. आणि प्रा.विजय गायकवाड पुणे यांनी बुद्ध धम्माचे आचरण केला तर आम्हाला सुख शांती मिळते.आपण सर्व बुद्ध मार्गाने चालले पाहिजे असे विचार डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला दिले आहे.आपणा सर्वाना ते पाळावे लागले तरच आपले जिवन सार्थक ठरणार आहे असे सांगितले.

या कार्यक्रमात सौ.अपर्णा सि.सांगलिकर, बसवेश्वर विद्या प्रतिष्ठित गुगवाडचे सचिव प्रभाकर सनमडीकर, शिवाप्पा तांवशी, हनिफ मिरजकर, शंकर कांबळे,उपसंरपच किशोर बामणे,मिरज,सांगली व जत तालुक्यातील शिक्षक, विद्यार्थी, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कालकथित अर्थव सांगलीकर यांच्या जन्मदिनानिमित्त विशेष प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थाचा सत्कार करताना प्रांताधिकारी तुषार ढोंबरे,दिनकर पाटील,सी.आर.सांगलीकर

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here