राजे रामराव महाविद्यालयाच्या सुवर्ण महोत्सव व इंडोअर स्पोर्ट्स हॉलचे 2 ऑक्टोंबरला उद्घाटन

0

जत दि. २६ (प्रतिनिधी):राजे रामराव महाविद्यालयाची स्थापना जून 1969 रोजी झाली असून सन 2018-19 या शैक्षणिक वर्षात महाविद्यालय पन्नास वर्षात पदार्पण करीत आहे. या सुवर्ण महोत्सवी वर्षात अनेक कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून या सुवर्ण महोत्सवाचे प्रातिनिधिक स्वरुपात उद्घाटन तसेच  नव्याने बांधलेल्या प्रयोगशाळा ईमारतीचे व यु.जी.सी. च्या अनुदानातून बांधलेल्या इंडोअर स्पोर्ट्स फॅसिलीटी हाॅल चे उद्घाटन सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री व सहकार, पणन व वास्त्रोद्योग मंत्री मा. सुभाष (बापू) देशमुख यांच्या हस्ते शुक्रवार दि.2 नोव्हेंबर 2018 रोजी सकाळी 10.00 वाजता करण्यात येणार असल्याची माहिती महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे यांनी दिली.
या उद्घाटन कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष मा. अभयकुमार साळुंखे हे भूषविणार असून या प्रसंगी संस्थेच्या सचिवा मा. प्राचार्या सौ. शुभांगी गावडे, सहसचिव प्रशासन प्राचार्य डॉ. युवराज भोसले, मा. आमदार विलासराव जगताप व ज्यांच्या उदार दातृत्वाने हे महाविद्यालय उभा आहे त्या डफळे घराण्याचे श्रीमंत इंद्रजीत राजे डफळे, श्रीमंत शार्दुलराजे डफळे उपस्थित राहणार आहेत. तरी महाविद्यालयावरती प्रेम करणारे जत तालुक्यातील नागरिकांनी व माजी विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. व्ही. एस. ढेकळे व समन्वयक डॉ. श्रीकांत कोकरे यांनी केले आहे.

Rate Card

Leave A Reply

Your email address will not be published.

कॉपी करू नका.