जत,प्रतिनिधी:जत तालुक्यातील रामपूर,मलाळ,येळदरी,
बागेवाडी,कंठी,वाषाण,बेंळूखी व खलाटी या आठ गावांना वादळी वारे व गारपीटीचा जोरदार तडाका बसला.त्यात 224 हेक्टरमधील द्राक्ष, डाळिंब, पपई, मका,ज्वारी, ऊस या पिकांना फटका बसला.तर वादळाने पंचवीस घराचे नुकसान झाले.वादळ व गारपीठीमुळे सुमारे सव्वाशे कोटी रूपयाचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
गुरूवारी सांयकाळी तालुक्यात गारपिट व जोरदार वादळी वारे यांनी अक्षरशः थैमान घातले.दुष्काळाने कंबरडे मोडलेल्या शेतकऱ्यांवर निसर्गाचा पुन्हा कोप झाला. येळदरी, रामपूर,मलाळ,घाटगेवाडी, वाषाण, बेळूखी, खलाटी,कंठी व बागेवाडी या पट्ट्यात हवेचा कमी दाब निर्माण होऊन सोसाट्याचा वारा व चक्रीवादळाने हाहाःकार माजिवला.अनेक झाडे उन्मळून पडली. द्राक्ष,डाळिंब, पपई बागा, मका पीके जमीनदोस्त झाली.
वादळी वाऱ्यानंतर अचानक गारपीटीस सुरूवात झाली. त्यात द्राक्ष,पपई, हळद, मका यांना यांचा सर्वाधिक फटका बसला.
रामपूर येथील 126 हेक्टर मधील द्राक्ष, हळद, मका व पपई या पिकांचे शंभर टक्के नुकसान झाले आहे.तर ऊसाचे पन्नास टक्के नुकसान झाले आहे.घाटगेवाडी परिसरातील शेतकरी खुद्दाबक्ष महेबूब मुल्ला व त्यांच्या भावांच्या वीस एकर द्राक्ष बागेचे व दोन एकर मक्याचे मोठे नुकसान झाले आहे.बागेवाडी येथील 31 हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष बागा व ऊस पिकाचे नुकसान झाले. 62 शेतकऱ्यांना निसर्गिक अपत्तीचा फटका बसला. कंठी येथील 31 हेक्टर, बेळुंखी 11.40 हेक्टर, खलाटी 5.30 हेक्टर, वाषाण 11 हेक्टर, येळदरी 7.89 हेक्टर, व मलाळ येथील 0.80 हेक्टर क्षेत्रातील द्राक्ष, ऊस,मिरची,हळद या पिकांचे नुकसान झाले. सर्वाधिक फटका द्राक्ष बागाना बसला असून द्राक्ष बागाचे 90 टक्के नुकसान झाले आहे.वादळी वाऱ्यांमुळे पंचवीस घराचे नुकसान झाले आहे.बागेवाडी येथील 3 तर रामपूर येथील 4 घरे,वादळाने पुर्णपणे उद्धवस्त झाले आहेत.बागेवाडी येथील 7, कंठी 5, रामपूर येथील 6 अशा 18 घरांचे वादळामुळे अशंत:नुकसान झाले आहे.
जत तालुक्यात आलेल्या नैसर्गिक अपत्तीचा 260 शेतकऱ्यांना फटका बसला. तर 224.39 हेक्टर क्षेत्रातील बागायत व पिके उद्धवस्त झाली.प्राथमिक अंदाजानुसार 125 कोटी रूपयाचे नुकसान झाले आहे.
तहसीलदार सचिन पाटील,जतचे मंडल अधिकारी,संदिप मोरे, डफळापूरचे मंडल अधिकारी मुलाणी सर्व तलाठी ,कृषी विभागाचे अधिकारी यांनी नुकसान ग्रस्त शेतीचे तातडीने पंचनामे केले आहेत.
राष्ट्रवादीचे नेते सुरेश शिंदे यांनी रामपूर घाटगेवाडी येथील नुकसान शेतकऱ्यांचे समक्ष भेट देऊन सांत्वन केले. ते म्हणाले, दुष्काळी जत तालुक्यावर नैसर्गिक आपत्ती कोसळली आहे.कर्ज काढून व टँकरने पाणी घालून द्राक्ष बागा जगविल्या आहेत.गारपीटीमुळे द्राक्षबागाचे.100 टक्के नुकसान झाले आहे. त्यामुळे अनेक शेतकरी उद्धवस्त झाले आहेत. शासनाने त्यांना तातडीने मदत द्यावी.व नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची कर्जे माफ करावीत.जत : बागेवाडी ता.जत येथे वादळाने घराचे उडालेले छत,घाटगेवाडी रामपूर येथे गारपीटीने नुकसान झालेली द्राक्ष बाग