जत,प्रतिनिधी: जत तालुक्यातील घाटगेवाडी, रामपूर परिसरातील गुरूवारी सांयकाळी झालेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटी मुळे नुकसान ग्रस्त शेतकऱ्यांची कॉग्रेस नेते विक्रम यांनी भेट घेतली.परिसरात निसर्गाच्या प्रकोपामुळे बागायत शेती उद्धवस्त झाली आहे.शासनाने तातडीने प्रत्यक्षात नुकसान बघून भरपाई द्यावी. अनेक बागांना फळे येण्याच्या स्थितीत फटका बसला आहे.त्यांचे लाखो रूपयाचे नुकसान झाले आहे.त्यामुळे बागायदार शेतकरी मोठ्या अडचणीत आले आहेत.त्यांना शासनाने मदत करावी.
तालुकाध्यक्ष अप्पाराया बिरादार,माजी पं.स.सदस्य पिराप्पा माळी,पं.स.सदस्य रविंद्र सावंत,फिरोज नदाफ,ग्रा.प.सदस्य रमेश कोळेकर,राजू इनामदार,मंजू एनापुरे,बंटी नदाफ,सलीम नदाफ,मकबूल नदाफ,व पदाधिकारी उपस्थित होते.