जत,प्रतिनिधी: जत शहरातून जाणाऱ्या विजापूर-गुहागर मार्गावर खड्ड्यात भरलेल्या खड्डीवर पाणी न मारल्याने धूळ व खडे उडण्याने अपघात होत आहेत. या खड्डी दिवसातून दोन वेळा पाणी मारावे व रोलींग करून रस्ता मजबूत करावा या मागणीचे निवेदन तहसीलदार सचिन पाटील व पोलीसांना सामाजिक कार्यकर्त्यांनी दिले.
शहरातील मार्गाचे काम रखडले आहे. त्यामुळे मोठाले खड्डे पडले होते. ते भरावेत अशी मागणी झाल्याने संबधित ठेकेदाराने खड्डे खड्डी टाकून भरले आहे.मात्र रस्तावरील ही खड्डी उचटली आहे.त्याशिवाय टाकलेल्या मातीमुळे धूळीचे सामाज्र मार्गावर होत आहे. त्यामुळे अपघात नित्याचे झाले आहेत.शहरातील रस्त्याचे काम होईपर्यत या धोकादायक रस्त्यावर दररोज दोन वेळा पाणी मारून रस्ता मजबूत करावा अशी मागणी निवेदनात केली आहे.यावेळी श्रावण पाथरूट,अशोक धोत्रे,प्रविण पाथरूट,खंडू पाटील,मकबूल नदाफ,जुबेर पटाईत,व गणेश गिड्डे उपस्थित होते.
जत शहरातील रस्त्यावर पाणी मारावे या मागणीचे निवेदन तहसीलदार यांना देताना