जेष्ठ समाजसुधारक आण्णा हजारे यांना जतला येण्याचे तुकाराम महाराज यांचे निमंत्रण

0
7

जत,प्रतिनिधी: गोधळेवाडी ता.जत येथील सद्गुरू बागडेबाबा मठाचे मठाधिपती श्री.संत तुकाराम महाराज यांनी जेष्ठ सामाजसुधारक आण्णा हजारे यांची राळेगणसिंध्दी येथे भेट घेतली.जत तालुक्यात येण्याचे त्यांना तुकाराम महाराज यांनी निमंत्रण दिले.तुम्ही सामाजिक कार्यक्रमाचे नियोजन करा मी दुष्काळी जतसाठी निश्चित येतो असे आश्वासन हजारे यांनी दिल्याचे तुकाराम महाराज यांनी सांगितले.
तुकाराम महाराज, उद्योजक श्री.लोंढे साहेब,जयदीप मोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
जतच्या दुष्काळी भागातील जनतेला स्व:तात घरे बांधून देणे,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वच्छ भारत अभियानात अल्प किंमतीत स्वच्छता गृहे बांधणे,असे स्व:ताच्या उद्योगातून येणाऱ्या उत्पनातून सामाजिक कामे करणाऱ्या तुकाराम महाराज यांचे आण्णा हजारे यांनी कौतुक केले.जत सारख्या दुर्लक्षीत तालुक्यात तुमच्या सारखे नवयुवक परिवर्तनाची नांदी ठरावेत अशा शुभेच्छा हजारे यांनी दिल्या.
तुकाराम महाराज यांनी त्यांच्या चिकलगी भुयार,व गोधळेवाडी मठात अधात्मिक कामाबरोबर उद्योग उभारत करत असलेल्या कामाची माहिती आण्णांना दिली.या उद्योगांत दुष्काळी भागातील बेरोजगार तरूणांना काम मिळवूने देत जपलेल्या सामाजिक बांधिलकीची काही छायाचित्रे तुकाराम महाराज यांनी आण्णांना दाखविली.
जतच्या दुष्काळी परिस्थितीची आण्णांनी आपुलकिंनी तुमच्या भागात पाऊस पडला आहे का.? पिके कशी आहेत.जनतेचे प्रश्न सुटतात का.?आदी विषयाची
तुकाराम महाराज यांना माहिती विचारली.मनमोकळेपणाने तब्बल दोन तास तुकाराम महाराज यांच्याशी आण्णा हजारे यांनी चर्चा केली.विविध विषयावर मार्गदर्शन केले.त्याशिवाय जनहितासाठी काम कायम ठेवा मी तुमच्या पाठीशी आहे.असेही आण्णांनी सांगितल्याचे तुकाराम महाराज यांनी सांगितले.
त्याशिवाय जतला येण्याचे निमंत्रण आण्णांनी स्विकारल्याचे व त्यासाठी दुष्काळी निवारणार्थ एक आगळावेगळा कार्यक्रमाचे आयोजन करणार असल्याचे यावेळी तुकाराम महाराज यांनी सांगितले.

जत: राळेगणसिंध्दी येथे जेष्ठ समाजसुधारक आण्णा हजारे यांच्याशी चर्चा करताना गोधळेंवाडी ता.जत मठाचे तुकाराम महाराज,उद्योजक श्री.लोंढे साहेब

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here