जत,प्रतिनिधी: माडग्याळ ग्रामीण रुग्णालयांच्या उद्घाटनानंतर पाच दिवसात रुगणालयाचे अधिक्षक डॉ.एम.डी.गडदे यांची बदली,तर साहय्यक डॉक्टर डॉ.विशाल बनसोडे,डॉ.दिनेश कुलाळ या दोन डॉक्टरांनी राजीनामा दिल्यामुळे रुग्णालय डॉक्टरांविना ओसाड पडले आहे.तातडीने दुसरे डॉक्टर नेमावेत अन्यथा रुग्णालयास टाळे ठोकण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे.
बुधवारी रूग्णांवर उपचार करण्यासाठी डॉक्टर उपलब्धं नसल्याने उपचाराविना परत फिरावे लागले.रुग्णालयाचे तिसऱ्या वेळी शनिवारी पालकमंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते उद्घाटन झाले आहे.आमदार विलासराव जगताप, सभापती तम्माणगोंडा रवीपाटील व तालुक्यातील प्रमुख मान्यवर यावेळी उपस्थित होते. उद्धाटनानंतर चौथ्या दिवशी तडकाफडकी अधिक्षक गडदे यांची बदली झाली. त्यानंतर मंगळवारी रुग्णालयाचे 2 सा.डॉक्टरांनी राजीनामा दिल्याने तर्कवितर्क लावले जात आहेत.
परिणामी आज गुरूवारी होणाऱ्या कुंटूब नियोजन शस्ञक्रिया होणार नाहीत.त्याशिवाय रुग्णावर उपचार कोन करणार असा गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे.
माडग्याळ येथे पुर्व भागातील नागरिकांच्या आरोग्य सेवेसाठी रूग्णालयाची भव्य इमारत,कर्मचारी निवासस्थान यासाठी सुमारे 6 कोटी खर्चून 30 बेडचे प्रशस्त रुग्णालय उभारले आहे. सध्या माडग्याळ व कवटेमंहकाळ उपजिल्हा रूग्णालय अशा दोन्ही रुग्णालयाचा पदभार अधिक्षक डॉ.गडदे यांच्याकडे होता.त्यांच्या शिवाय अन्य दोन डॉक्टर व मर्यादीत कर्मचारीच्या मदतीने रुग्णालय कसेबसे सुरू आहे. त्यात शनिवारी नव्याने रुग्णालयाचे उद्घाटन पालकमंञ्यांच्या हस्ते झाले आहे.त्यानंतर घडलेल्या या घडामोडीनंतर आश्चर्य व्यक्त होत आहे.
दरम्यान याबाबत जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.संजय सांळुखे यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, अधिक्षकांना बदली नंतर तातडीने कार्यमुक्त करण्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे आदेश आहेत.डॉ.गडदे यांच्या बदलीचे आदेश वरिष्ठ पातळीवरून आहेत.त्यांच्या आदेशावरून आम्ही डॉ.गडदे यांना माडग्याळ रुग्णालयातून कार्यमुक्त केले आहे.यात आम्हाला काहीही करता येत नाही.सर्व अधिकारी आरोग्य उपसंचालकास असतात.असे डॉ. सांळुखे यांनी सांगितले
Home Uncategorized माडग्याळ ग्रामीण रुग्णालय अधिक्षकाची बदली,दोन डॉक्टरांचे राजीनामे रुग्णावर उपचार, शस्ञक्रिया थांबल्या...