जतमध्ये भावपूर्ण वातावरणात गणरायाला निरोप

0
7

जत,प्रतिनिधी : अनंत चतुर्दशीच्या मुहूर्तावर जतकरांनी लाडक्या गणरायाला वाजत गाजत भावपूर्ण निरोप दिला. जतमध्ये काढण्यात आलेली विसर्जन मिरवणूकी आदर्श ठरल्या. ती केवळ डीजे आणि गुलाल उधळणीला फाटा दिल्यामुळे. पारंपरिक पद्धतीने ढोल ताशा च्या वादनात बाप्पाची मिरवणुकीला सायकांळी 4 वाजता सुरुवात करण्यात आली. प्रारंभी नाशिक महापालिकेचा मानाचा गणपती प्रथम क्रमांकावर होता या मिरवणुकीत सुमारे 21 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी सहभाग नोंदविला. सर्वच गणेश मंडळांनी डीजे वापरावर बंदी घातली याऐवजी पारपारिंक वाद्यानां पसंती दिली. त्यामुळे शहरातील सगळ्याच पारपारिंक वाद्याच्या चालकांना रोजगारही मिळाला पारंपारिक पोषाखात तरुण-तरुणी कमरेला ढोल-ताशा बांधून वाजत गाजत बाप्पाला निरोप देत होते. यावेळी काही पथकांमधील सदस्यांनी ध्वजकरीची भूमिका पार पडली हातात उंचच उंच भगवे ध्वज घेऊन हे ध्वजकरी ढोल ताशांच्या तालावर थिरकत होते. मिरवणुकीत शहरातील एकूण सुमारे 10 मंडळांनी सहभाग घेतला आहे. विसर्जन मिरवणुकीत मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते. संपूर्ण मिरवणूक मार्ग सीसीटीव्ही केमेऱ्यांच्या नजरेत होता. तसेच राज्य राखीव दलाच्या तुकडीसह मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता
‘गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या’, ‘मंगलमूर्ती मोरया, बाप्पा मोरया,’ ‘अर्धा लाडू फुटला, गणपती बाप्पा उठला’, ‘ असा जयघोष करत बापाला भावपूर्ण निरोप दिला.
दरम्यान, घरगुती मंडळांनी देखील बाप्पाला उत्साहात निरोप दिला, यावेळी गणपतीचे पर्यावरणपूरक विसर्जन करत जतकरांनी ‘वुई विल डू नो पोलूशन, इको फ्रेंडली गणपती सोल्युशन’ असा संदेश देत प्रदूषण रोखण्यासाठी हातभार लावला.मूर्ती संकलन करण्यासाठी विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थानी पुढाकार घेतला होता.  

Sankettimes

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here